महाराष्ट्रात येतो चिनी प्लास्टिक तांदूळ!
By Admin | Published: August 1, 2015 01:09 AM2015-08-01T01:09:57+5:302015-08-01T01:09:57+5:30
भारतीयांच्या पोटात चीनमधून येणारा प्लास्टिकचा तांदूळ बेमालूम शिरत असल्याची धक्कादायक बातमी हाती आली आहे. चीनने पहिला मारा गुजरातवर केला असून सुरतमार्गे दक्षिण गुजरातमधून
- रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
भारतीयांच्या पोटात चीनमधून येणारा प्लास्टिकचा तांदूळ बेमालूम शिरत असल्याची धक्कादायक बातमी हाती आली आहे. चीनने पहिला मारा गुजरातवर केला असून सुरतमार्गे दक्षिण गुजरातमधून हा चिनी तांदूळ महाराष्ट्रातही येत आहे. काही ब्रॅण्ड केंद्राच्या निरीक्षणात आहेत.
सणासुदीच्या दिवसात प्लास्टिकचा चिनी तांदूळ महाराष्ट्रातील बहुतांशी भागात असण्याची दाट शक्यता आहे. हा तांदूळ देशी तांदळात अगदी सोप्या पद्धतीने मिसळतो की शोधूनही समजत नाही. हा तांदूळ जेव्हा शिजतो तेव्हा फुटून त्याचा घट्ट पाक तयार होतो आणि तो दुसऱ्या भाताच्या शिताला चिकटतो. खाताना चव कळत नाही, त्यामुळे सिंथेटिक भात पोटात गेला हे जाणवत नाही. केंद्रीय अन्नधान्य महामंडळाचे सदस्य आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केंद्रीय अन्नधान्य वितरणमंत्री रामविलास पासवान यांना एका सविस्तर पत्रातून ही तक्रार केली. त्यांनी गुजरातमध्ये तेथील अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या चिनी प्लास्टिक तांदळाचे एक पाकीट पासवान यांना दिले. ते बघून पासवान यांना धक्काच बसला.
‘लोकमत’शी बोलताना विष्णू मनोहर म्हणाले की, हा तांदूळ शिजला की त्याचा भुसा होतो. तो पाण्यात मिसळतो आणि शिजलेल्या भाताच्या शिताला तो चिकटतो.