चिपी विमानतळावर पहिले विमान उतरले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:40 PM2018-09-12T12:40:21+5:302018-09-12T12:40:56+5:30
सिंधुदुर्गवासियांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे सिंधुदुर्गवासियांच्या हक्काच्या विमानतळाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
चिपी : सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर आज गणेशोत्वापूर्वीच पहिले विमान गणपती बाप्पांना घेऊन उतरले. यावेळी सिंधुदुर्गवासियांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे सिंधुदुर्गवासियांच्या हक्काच्या विमानतळाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गणेश चतुर्थीपूर्वीच चिपी विमानतळ वाहतुकीस खुला केला जाणार असल्याचे सांगितले होते. यावरून काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी हे विमान खासगी असल्याचे सांगत जर सरकारी असेल तर केसरकर यांनी स्वत: या विमानातून यावे, असे आव्हान दिले होते.
या सर्व आरोपप्रत्यारोपांच्या धुरळ्यामध्ये अखेर आज चिपी विमानतळावर 12 आसनी विमान गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन उतरले. यावेळी विमान उतरण्याचा क्षण कैद करण्यासाठी सिंधुदुर्गवासियांनी मोठी गर्दी केली होती. हे विमान मुंबईहून नाही तर चेन्नईहून चिपी विमानतळावर दाखल झाले आहे.