थकीत वेतनासाठी चित्रा साळुंखे हायकोर्टात

By Admin | Published: April 3, 2015 02:24 AM2015-04-03T02:24:09+5:302015-04-03T02:24:09+5:30

: सिद्धार्थ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या चित्रा साळुंखे यांनी निलंबनाच्या काळातील थकीत वेतन न मिळाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

Chitra Salunkhe High Court for tired wages | थकीत वेतनासाठी चित्रा साळुंखे हायकोर्टात

थकीत वेतनासाठी चित्रा साळुंखे हायकोर्टात

googlenewsNext

मुंबई : सिद्धार्थ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या चित्रा साळुंखे यांनी निलंबनाच्या काळातील थकीत वेतन न मिळाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने तंत्र व शिक्षण विभागाचे संचालक व उपसंचालक यांना नोटीस जारी केली आहे. साळुंखे यांचे थकीत वेतन ३० लाख रुपये आहे.
साळुंखे यांची कला शाखेची पदवी बनावट असल्याचा ठपका ठेवत महाविद्यालयाने त्यांना निलंबित केले. साळुंखे यांनी त्याला विद्यापीठातील लवादामध्ये आव्हान दिले. तेथे निलंबन वैध ठरल्यानंतर त्याला साळुंखे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथे हे निलंबन बेकायदा ठरवून साळुंखे यांना निलंबनाच्या काळातील वेतन देण्याचे आदेश दिले.
त्यापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केले.
मात्र अद्याप हे थकीत वेतन न मिळाल्याने साळुंखे यांनी ही याचिका केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chitra Salunkhe High Court for tired wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.