महिला सुरक्षा फक्त भाषणात नव्हे, तर प्रत्यक्षात हवी: चित्रा वाघ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:58 AM2020-02-04T11:58:35+5:302020-02-04T11:59:34+5:30
पिडीतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुंबई : जालन्याची घटना ताजी असतांनाचं वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी घडली. यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. महिला सुरक्षा फक्त भाषणात नको तर प्रत्यक्षात हवी, असा टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची घटना गंभीर असून राज्यातं कायदा सुरक्षेचे धिंडवडे निघतांना पाहायला मिळत आहे.
जालन्याची घटना ताजी असतांनाचं वर्धा जिल्ह्यातं हिंगणघाट येथे सकाळी भर रस्त्यावर नांदोरी चौकात एका शिक्षिका असणाऱ्या युवतीला जिवंत जाळण्याचा गंभीर प्रकार घडलायं ज्यात युवती गंभीर जखमी झालेली आहे.राज्यातं कायदा सुरक्षेचे धिंडवडे निघतांना दिसताहेत (1/2) @CMOMaharashtra@Dev_Fadnavispic.twitter.com/yGutyoeec2
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 3, 2020
तर विकृतांना कायद्याची भिती उरलेली दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगणघाट येथील प्रकरणातं स्वत: लक्ष घालून आरोपीवर कडक कारवाई करत, पिडीतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच महिला सुरक्षा फक्त भाषणात नको, तर प्रत्यक्षात हवी अशी अपेक्षा राज्यातील महिलांना असल्याचा टोला सुद्धा त्यांनी यावेळी सरकाराला लगावला.