Chitra Wagh vs Mahavikas Aghadi: "उल्टा चोर कोतवाल को डांटे! आणखी किती पापं कराल अन् कुठे फेडाल?", चित्रा वाघ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:16 PM2022-12-12T21:16:58+5:302022-12-12T21:17:19+5:30

"वडेट्टीवार, तटकरे, सुभाष देसाईंच्या ताफ्यात निर्भया फंडाची वाहने कुणी दिली?"

Chitra Wagh slams Mahavikas Aghadi leaders over Nirbhaya Fund misuse | Chitra Wagh vs Mahavikas Aghadi: "उल्टा चोर कोतवाल को डांटे! आणखी किती पापं कराल अन् कुठे फेडाल?", चित्रा वाघ यांचा सवाल

Chitra Wagh vs Mahavikas Aghadi: "उल्टा चोर कोतवाल को डांटे! आणखी किती पापं कराल अन् कुठे फेडाल?", चित्रा वाघ यांचा सवाल

googlenewsNext

Chitra Wagh vs Mahavikas Aghadi: केंद्र सरकारकडून मिळालेल्या निर्भया निधीतून २२० वाहने खरेदी करायची. त्यातील १२१ वाहने पोलीस ठाण्यांना द्यायची आणि ९९ वाहने स्वत:च इतर विभागांना वाटायची. म्हणजे निर्भया पथकाची वाहने इतर विभागांना महाविकास आघाडी सरकारनेच दिलेली असताना आताच्या सरकारच्या नावाने बोंबा मारायच्या. अशी आणखी किती पापं करणार आणि ती कुठे फेडणार, असा रोखठोक सवाल भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. भाजपा कार्यालयात एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

गेल्या दोन दिवसांपासून निर्भया पथकाची वाहने मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरली, असा कांगावा विविध नेते करीत आहेत. त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना चित्रा वाघ म्हणाल्या, "महाविकास आघाडी सरकारच्याच काळात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्भया निधीतून २२० वाहने खरेदी करण्यात आली. या २२० वाहनांपैकी १२१ वाहने  मुंबईतील एकूण ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आली. तर ९९ वाहने ही इतर विभागांना वितरित करण्यात आली, हे वितरण १९ मे २०२२ रोजी करण्यात आले. सर्वांत आश्चर्य म्हणजे ९ मंत्र्यांच्या दावणीत ही निर्भया निधीची वाहने देण्यात आली. तर १२ वाहने VVIP ताफ्यासाठी देण्यात आली. यात मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुनील तटकरे, सुभाष देसाई इत्यादींचा समावेश होता. सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यांसाठी सुद्धा याच निर्भया निधीतून घेण्यात आलेली वाहने वापरण्यात आली. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा निर्भया निधीतील वाहन वापरायचे आणि इकडे मात्र शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर टीका करायची, हा दुटप्पीपणा कशाला?"

"वस्तुत: निर्भया निधीतून खरेदी करण्यात आली असताना ती पोलिस विभागाने जलद प्रतिसाद पथक, श्वान पथक, संरक्षण शाखा, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, लाचलुचपत विभाग, मोटर परिवहन विभाग इत्यादी विभागांना करण्यात आले. हीच वाहने वाहतूक विभाग वरळीला 17 वाहने देण्यात आली. आदित्य ठाकरेंच्या वरळीवर विशेष लक्ष दिले गेले, हे ठीक. पण, निर्भया पथकाची वाहने आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात देताना तत्कालिन गृहविभागाला लाज वाटली नाही का? आता आमचे सरकार आहे, तर ही सर्व वाहने पुन्हा निर्भया पथकासाठी देण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. ती येत्या आठवडाभरात पूर्ण होईल," असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Web Title: Chitra Wagh slams Mahavikas Aghadi leaders over Nirbhaya Fund misuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.