Chitra Wagh-Urfi Javed : 'संजय आठवतोय का..? उर्फी जावेदची चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 05:12 PM2023-01-03T17:12:13+5:302023-01-03T17:13:01+5:30

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात सध्या नवीन वादाला तोंड फुटले आहे.

Chitra Wagh-Urfi Javed: Do you remember Sanjay rathod? Urfi Javed's criticism of Chitra Wagh | Chitra Wagh-Urfi Javed : 'संजय आठवतोय का..? उर्फी जावेदची चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका

Chitra Wagh-Urfi Javed : 'संजय आठवतोय का..? उर्फी जावेदची चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका

googlenewsNext

Chitra Wagh-Urfi Javed : उर्फी जावेदची (Urfi Javed) वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सोशल मीडियावर उर्फीच्या नावाची चर्चा रोजचं होत असते. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आलेली उर्फी आपल्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच नेहमीच प्रकाशझोतात असते. यातच आता उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात तोकड्या कपड्यावरुन नवीन वाद सुरू झाला आहे.

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपडे घालून आल्यामुळे उर्फी जावेदवर टीका होत असते. यातच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेव्हापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडिया वॉर सुरू झाला आहे. 

एकीकडे चित्रा वाघ यांची उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार, तर दुसरीकडे उर्फीनेही सोशल मीडियावरुन चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे. या दोघींच्या वादात आता शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आले आहे. उर्फीने नुकतच एक ट्विट करत चित्रा वाघ यांना संजय राठोड प्रकरणाची आठवण करुन दिली आहे. 'मी भाजपमध्ये प्रवेश केल्यास चित्रा वाघ यांच्याशी मैत्री करची वाट पाहू शकत नाही. तुम्हाला संजय आठवतोय का..? भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही संजय राठोड यांच्या सर्व चुका विसरलात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या विरोधात खूप हल्लाबोल केला होता.' असे ट्विट उर्फीनं केलं आहे.
 

Web Title: Chitra Wagh-Urfi Javed: Do you remember Sanjay rathod? Urfi Javed's criticism of Chitra Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.