"स्टार" कासवांची तस्करी करणा-या पित्रापुत्राला बेड्या, 200 कासव जप्त

By admin | Published: July 5, 2017 09:17 AM2017-07-05T09:17:16+5:302017-07-05T09:17:16+5:30

कल्याणमध्ये दुर्मिळ प्रजातीच्या "स्टार" कासवांची तस्करी करणा-या पितापुत्राला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या दोघांकडून जवळपास 200 स्टार कासव जप्त करण्यात आले आहेत.

Chitrakootra grabbed the "Star" kidnapper, captured 200 cartridges | "स्टार" कासवांची तस्करी करणा-या पित्रापुत्राला बेड्या, 200 कासव जप्त

"स्टार" कासवांची तस्करी करणा-या पित्रापुत्राला बेड्या, 200 कासव जप्त

Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 5 - दुर्मिळ प्रजातीच्या "स्टार" कासवांची तस्करी करणा-या पितापुत्राला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या दोघांकडून जवळपास 200 स्टार कासव जप्त करण्यात आले आहेत. वाईल्ड लाइफ कंट्रोल ब्युरोच्या अधिका-यांनी ही कारवाई करत कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून या दोघांना ताब्यात घेतले आहे.  
 
बंगळुरुतील दोन जण 200 स्टार कासव घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मुंबईच्या वाईल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो विभागाला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या सहकार्यानं सापळा रचला व दोघांना बेड्या ठोकल्या. आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
"स्टार" कासव घरामध्ये किंवा कार्यलयात ठेवल्यास व्यवसायात वाढ होण्यास मदत होते, अशी अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेतूनच कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते.   
 
दरम्यान, स्टार प्रजातीच्या कासवांना प्रचंड मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कासवांना मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कासवांची किंमती लाखो रुपये  असल्याची माहिती समोर येत आहे.  
 
(‘लक्ष्मी’दर्शनासाठी कासव होताहेत जेरबंद)
 
(दुर्मिळ कासवाची तस्करी करणारे त्रिकूट गजाआड)
 
(अंधश्रद्धेपोटी अजूनही होतेय मांडूळ, कासवाची तस्करी!)
का आहे कासवांना मोठ्या प्रमाणात मागणी? 
- अनेक लोकं घरात सजावटीसाठी कासव ठेवतात परंतु याचे महत्त्व केवळ सजावटीसाठी नाही. कासव कोणत्या धातूपासून, कोणत्या रंगाचे आणि आकाराचे आहे याचे वेगवेगळे अर्थ आहेत.
 
- कासव 200 वर्षांपेक्षा जास्त जगते. यामुळे वास्तूशास्त्र आणि फेंगशुई शास्त्राच्या दृष्टीने याला दीर्घकाळापर्यंत सुख-शांती प्रदान करणारे प्रतिक मानले जाते.
 
- कासवाला धन प्राप्तीचे सूचक मानले जाते, असा समज आहे. 
 

Web Title: Chitrakootra grabbed the "Star" kidnapper, captured 200 cartridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.