क्लोरिनगळतीने मृत्यू

By Admin | Published: November 4, 2015 02:42 AM2015-11-04T02:42:56+5:302015-11-04T02:42:56+5:30

शिवाजी उद्यमनगरमध्ये सिलिंडरमधून झालेल्या क्लोरिनच्या गळतीमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य २० जण बाधित झाले आहेत. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल

Chlorine death | क्लोरिनगळतीने मृत्यू

क्लोरिनगळतीने मृत्यू

googlenewsNext

कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगरमध्ये सिलिंडरमधून झालेल्या क्लोरिनच्या गळतीमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य २० जण बाधित झाले आहेत. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही गळती रोखण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
शिवाजी उद्यमनगर या मिनी औद्योगिक वसाहतीत एस. एस. एंटरप्राईजेस या वेल्डिंग कारखान्यात दुपारी पावणेदोनच्या सुमारास सिलिंडरमधून क्लोरिनगळती सुरू झाली. हा क्लोरिन सुमारे दोनशे मीटर परिसरात पसरल्याने अनेक जण गुदमरून बेशुद्ध पडले, अनेकांना उलट्या होऊ लागल्या, रस्त्यावरून जाणारे नागरिक चक्कर येऊन पडले. काही नागरिक भीतीने घरातून बाहेर येऊन सैरभैर पळू लागले. काही वेळातच हा परिसर निर्मनुष्य झाला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी गळती थांबविण्याचा प्रयत्न केला, त्यात सिलिंडरचा मुख्य व्हॉल्व्ह उडाल्याने हिरवा गॅस बाहेर पडू लागला. त्या वेळी मास्क लावून जवानांनी गळती रोखली.

Web Title: Chlorine death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.