नऊ सभापतींची निवड
By Admin | Published: July 19, 2016 01:46 AM2016-07-19T01:46:23+5:302016-07-19T01:46:23+5:30
महानगरपालिकेच्या परिवहन समिती व आठ विशेष समिती सभापतीपदासाठी राजमाता जिजाऊ सभागृहात निवडणुकीचे आयोजन करण्यात आले
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या परिवहन समिती व आठ विशेष समिती सभापतीपदासाठी राजमाता जिजाऊ सभागृहात निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पीठासन अधिकारी तसेच रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी नऊ सभापतींची निवड घोषित केली.
परिवहन समिती सभापती पदासाठी मोहन म्हात्रे यांची तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सायली शिंदे यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा समिती सभापती पदासाठी निवृत्ती जगताप, क्रीडा व सांस्कृतिक समिती लीलाधर नाईक, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती रमेश डोळे, विधी समिती सभापती पदासाठी गणेश म्हात्रे, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती पदासाठी सीमा गायकवाड, उद्यान व शहर सुशोभीकरण समिती तनुजा मढवी यांची निवड करण्यात आली. आठ विशेष समित्यांच्या उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रत्येक समितीकरिता एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने आरोग्य परिरक्षण समिती उपसभापती म्हणून उषा पुरु षोत्तम भोईर, महिला व बालकल्याण समिती सुजाता सूरज पाटील, पाणीपुरवठा समिती मोनिका लक्ष्मीकांत पाटील, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती उपसभापती मुद्रिका मधुकर गवळी, विधी समिती उपसभापती संगीता संदीप म्हात्रे, क्र ीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती उपसभापती, श्रध्दा साजुराम गवस, विद्यार्थी व युवक कल्याण समिती उपसभापती संध्या रामजित यादव, उद्यान व शहर सुशोभीकरण समिती उपसभापती जयश्री एकनाथ ठाकूर यांची बिनविरोध निवड झाल्याचे संबंधित पीठासन अधिकारी म्हणून घोषित केले. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना महापौर सुधाकर सोनवणे यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.