क्षमता, आवडीनुसार शाखा निवडा

By Admin | Published: July 22, 2016 01:33 AM2016-07-22T01:33:48+5:302016-07-22T01:33:48+5:30

जिद्द, चिकाटी, प्रयत्नात सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाखाली स्वत:ची क्षमता व आवड विचारात घेऊन दहावीनंतरच्या शिक्षणासाठी शाखा निवड करावी

Choose the ability, the branch accordingly | क्षमता, आवडीनुसार शाखा निवडा

क्षमता, आवडीनुसार शाखा निवडा

googlenewsNext


पिंपरी : जिद्द, चिकाटी, प्रयत्नात सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाखाली स्वत:ची क्षमता व आवड विचारात घेऊन दहावीनंतरच्या शिक्षणासाठी शाखा निवड करावी. अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्राशिवायही करिअर करता येते. कला व वाणिज्य शाखेतून बारावीला चांगले गुण प्राप्त करून अनेक शाखांमध्ये पदवी व पदविका घेऊन उच्च पगाराच्या नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी पिंपरीत केले.
पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम आणि नगरसेवक सद्गुरू कदम, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती निर्मला कदम, माजी नगरसेवक वसंत शेवडे, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण रुपनर, आनंदा फडतरे, एचए कामगार प्रतिनिधी विजय पाटील, कामगार नेत्या भारती घाग, राजू बनपट्टे, बसवराज शेट्टी आदी उपस्थित होते.
वेलणकर म्हणाले, ‘‘स्वत:ची सर्जनशीलता चांगली असेल, तर कला व वाणिज्य शाखेतून बारावीला चांगले गुण मिळवून आयआयटी, पवई येथून अभियांत्रिकीची पदवी घेता येते. कलात्मकता चांगली असेल, तर फॅशन डिझायनिंगमधूनदेखील कमी भांडवलात व्यवसाय उभारता येतो किंवा अधिक कष्टाची तयारी असल्यास मोठ्या फॅशन डिझायनरच्या हाताखाली वा मोठ्या कंपनीमध्ये नोकरीच्या संधी मिळतात. इंग्रजीचा बाऊ न करता प्रयत्नपूर्वक ही भाषा अवगत केल्यास इंग्रजीसह अनेक परकीय भाषांत संधी उपलब्ध आहेत. एफडीआयमुळे राज्यात अनेक परकीय कंपन्या आगामी काळात सुरू होणार आहेत. यामध्ये परकीय भाषेचे ज्ञान असणाऱ्या मुला-मुलींना चांगल्या संधी आहेत. (प्रतिनिधी)
>परदेशात संधी : स्पर्धा परीक्षांचाच विचार नको
बारावीनंतरच्या कोणत्याही शाखेतून परकीय भाषेची पदवी, पदविका मिळविता येते. यातून परदेशात नोकरी करण्याचीदेखील संधी मिळते. ज्यांचे चित्रकलेवर प्रभुत्व आहे त्यांना पुण्यातील अभिनव व मुंबईतील जे जे कॉलेज आॅफ फाइन आर्टमधून पदवी घेता येते. अभ्यासाची तयारी असेल, तर चांगल्या इन्स्टिट्यूटमधून बीसीए करूनदेखील नोकरीच्या अनेक संधी आहेत. स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त यूपीएससी, एमपीएससी असाच विचार केला जातो.

Web Title: Choose the ability, the branch accordingly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.