३० वर्षांपूर्वीचा ‘चॉपर मास्टर’ राजन

By admin | Published: November 5, 2015 03:03 AM2015-11-05T03:03:52+5:302015-11-05T03:03:52+5:30

सुमारे ३० वर्षांपूर्वी राजनला अटक केल्याची घटना टिळकनगर पोलिसांना आजही स्पष्ट आठवते. हत्याराने भरलेली रिक्षा घेऊन राजन राजावाडी रुग्णालय परिसरातून जाणार असल्याची माहिती

Chopper Master Rajan, 30 years ago | ३० वर्षांपूर्वीचा ‘चॉपर मास्टर’ राजन

३० वर्षांपूर्वीचा ‘चॉपर मास्टर’ राजन

Next

- मनीषा म्हात्रे,  मुंबई
सुमारे ३० वर्षांपूर्वी राजनला अटक केल्याची घटना टिळकनगर पोलिसांना आजही स्पष्ट आठवते. हत्याराने भरलेली रिक्षा घेऊन राजन राजावाडी रुग्णालय परिसरातून जाणार असल्याची माहिती टिळकनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.
राजनने पोलिसांवरच चॉपरने हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले. त्या वेळी उपनिरीक्षक राजाराम व्हनमाने या पथकामध्ये होते. शस्त्रसाठ्यासह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात राजनला अटक केली. ‘मला नमूद वेळी नमूद ठिकाणी बेकायदेशीर हत्यार बाळगल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी पकडले,’ असा एका ओळीचा जबाब त्याच्याकडून लिहून घेण्यात आला होता, असे व्हनमाने यांनी सांगितले. यात राजन जामिनावर सुटला आणि देशाबाहेर पसार झाला. मूळचा फलटण जिल्ह्यातील गिरवी गावचा राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन उर्फ ‘नाना’८०च्या दशकात सहकार सिनेमाबाहेर ब्लॅकमध्ये तिकिटे विकायचा. त्यानंतर तो डॉन राजन महादेव नायर उर्फ बडा राजनच्या संपर्कात आला. छोटा राजन हा कंपनीच्या दुसऱ्या फळीतील मास्टर होता. राजन हा चॉपर चालवण्यात पटाईत होता. त्यामुळे तो ‘चॉपर मास्टर’ म्हणून प्रसिद्ध झाला.

Web Title: Chopper Master Rajan, 30 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.