ख्रिस्ती मिशनरीचा साक्षीदार आंद्रिया चर्च

By Admin | Published: December 22, 2016 11:37 PM2016-12-22T23:37:35+5:302016-12-22T23:37:35+5:30

येत्या २५ तारखेला प्रभू येशु ख्रिस्त यांचा जन्मोत्सव अर्थात ख्रिसमस सर्वत्र साजरा होणार आहे.

Christian missionary witness Andrea Church | ख्रिस्ती मिशनरीचा साक्षीदार आंद्रिया चर्च

ख्रिस्ती मिशनरीचा साक्षीदार आंद्रिया चर्च

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत/अझहर शेख

नाशिक, दि. 22 - येत्या २५ तारखेला प्रभू येशु ख्रिस्त यांचा जन्मोत्सव अर्थात ख्रिसमस सर्वत्र साजरा होणार आहे. यानिमित्त नाशिकच्या सुमारे १२४ वर्षे जुन्या चर्चच्या इतिहासाचा लोकमत आॅनलाईनच्या वाचकांसाठी घेतलेला हा आढावा. 

शरणपुररोडवर मिशनरी रेव्हरन्ट विल्यम् प्राईस यांनी १८००  सालात लहानसे प्रार्थनास्थळ चॅपल बांधले. प्रार्थनास्थळ लहान पडू लागल्याने १८९२ साली सुमारे चार एकर जागेत क्रॉसच्या आकारात संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये संत आंद्रिया चर्च उभारण्यात आले. हे चर्च नाशिक शहरासह जिल्ह्यातील ख्रिस्ती मिशनरी चळवळीचा साक्षीदार आहे. ख्रिस्ती चळवळीला गती मिळाली ती या चर्चपासूनच. शरणपूर रोड परिसरात हे चर्च असून हा भाग ख्रिस्ती मिशनरीचा मुख्य केंद्र राहिले आहे.

या चर्चच्या बांधकामाचा खर्च त्याकाळात १९ हजार रूपये इतका आला होता. संपूर्ण दगडी बांधकाम आणि आतील बाजूस लाकडी कलाकुसर हे या चर्चचे वैशिष्ट असून चर्चच्या वास्तूचा आकार हे देखील स्थापत्यकलेचा एक आगळा नमुना आहे. हे चर्च क्रॉसच्या आकारात बांधण्यात आले. चर्चच्या बांधकाम सुमारे २८० दिवसांमध्ये पुर्णत्वास आले. चर्चसाठी लागणारे दगड हे नाशिकमधून उपलब्ध करुन घेण्यात आली. म्हसरुळजवळील चामर लेणी परिसराच्या डोंगरामध्ये खोदकाम करुन तेथून काळे पाषाण आणून चर्चचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर दगड हे डोेंगरावरूनच घडवून चर्चच्या ठिकाणी आणली गेली व तेथे त्याचे चुना व मातीच्या वापरात बांधकाम करण्यात आले आहे. चर्चची क्षमतादेखील अधिक असून यामध्ये एकाच वेळी २५०हून अधिक समाजबांधव प्रार्थना करू शकतात. सदर चर्च हे नाशिक जिल्ह्यातील पहिले चर्च असल्याची माहिती रेव्हरंन्ट अरुण शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. प्रभू येशू ख्रिस्त यांच जन्मोत्सव अर्थात ख्रिसमस सणाच्या निमित्ताने चर्चमध्ये सजावट, रंगरंगोटी, रोषणाईच्या कामाला वेग आला आहे. 

Web Title: Christian missionary witness Andrea Church

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.