नाताळ, नववर्षानिमित्त मुंबई ते गोवा विशेष गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 07:01 AM2018-12-23T07:01:50+5:302018-12-23T07:02:06+5:30
नाताळ आणि नववर्षाच्या सेलीब्रेशनसाठी मुंबईकर गोव्याला पसंती देतात. त्यामुळेच मध्य रेल्वेकडून नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबई-करमाळी (गोवा) आणि मुंबई-मडगाव प्रवासासाठी जादा विशेष गाड्या सोडल्या जातील.
मुंबई : नाताळ आणि नववर्षाच्या सेलीब्रेशनसाठी मुंबईकर गोव्याला पसंती देतात. त्यामुळेच मध्य रेल्वेकडून नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबई-करमाळी (गोवा) आणि मुंबई-मडगाव प्रवासासाठी जादा विशेष गाड्या सोडल्या जातील.
०२००१ क्रमांकाची विशेष गाडी ही मुंबई-करमाळी अशी धावेल. २४ डिसेंबर, ३१ डिसेंबरला तिच्या फेऱ्या होतील. ती मध्यरात्री १२.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल, तर ०२००२ क्रमांकाच्या सुपरफास्ट गाडी २५ डिसेंबर, १ जानेवारीला दुपारी दोनला करमाळीवरून सुटेल.
६ वातानुकूलित डबल डेकर कोच असलेल्या या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थीवीम येथे थांबतील. ०११२७ क्रमांकाची विशेष गाडी मुंबई-मडगाव अशी धावेल. सीएसएमटीवरून ती २७ डिसेंबर, ३ जानेवारीला दुपारी ११.५ वाजता सुटेल. या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थीवीम, करमाळी येथे थांबतील. १३ वातानुकूलित, ३ टियर थर्ड एसी अशी या गाडीची रचना असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.