कल्पना गिरी प्रकरण सीआयडीकडे

By Admin | Published: May 10, 2014 10:08 PM2014-05-10T22:08:00+5:302014-05-11T00:02:59+5:30

येथील बहुचर्चित युवक काँग्रेस पदाधिकारी ॲड़कल्पना गिरी खून प्रकरणाचा तपास आता पुणे सीआयडीकडे सोपविण्यात येत आहे़

CID to the case | कल्पना गिरी प्रकरण सीआयडीकडे

कल्पना गिरी प्रकरण सीआयडीकडे

googlenewsNext

पोलीस महासंचालकांचा आदेश
लातूर : येथील बहुचर्चित युवक काँग्रेस पदाधिकारी ॲड़कल्पना गिरी खून प्रकरणाचा तपास आता पुणे सीआयडीकडे सोपविण्यात येत आहे़
ॲड़कल्पना गिरी खून प्रकरणाने ऐन लोकसभा निवडणुकीत खळबळ उडवून दिली होती़ या प्रकरणात युवक काँग्रेसचा पदाधिकारी महेंदसिंह चौहाण, समीर किल्लारीकर, श्रीरंग ठाकूर, हॉटेल व्यवसायिक प्रभाकर शे˜ी यांना अटक करण्यात आली आहे़ दरम्यान, पोलिसांच्या रडारवर आणखी दोन संशयित होते़ त्यांना ताब्यात घेण्यापूर्वीच शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तपास पुणे सीआयडीकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश धडकला़
दरम्यान, पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे कागदपत्रे त्यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत़ पोलिस अधीक्षक बी़जी़ गायकर यांच्याकडून ही सूचना तपास अधिकारी बी़जी़ मिसाळ यांना देण्यात आली आहे़ सोमवारी ते ही कागदपत्रे घेऊन महासंचालकांकडे रवाना होणार आहेत़ तेथूनच मग ही कागदपत्रे सीआयडीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत़

Web Title: CID to the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.