कैद्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी

By admin | Published: June 29, 2017 01:31 AM2017-06-29T01:31:23+5:302017-06-29T01:31:23+5:30

भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचा तपास बुधवारी गुन्हे शाखेकडे (सीआयडी) सोपविण्यात आला. यासाठी समाजसेवा

CID inquiry of prisoner's death | कैद्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी

कैद्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचा तपास बुधवारी गुन्हे शाखेकडे (सीआयडी) सोपविण्यात आला. यासाठी समाजसेवा शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रभा राऊळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दोन अंडी आणि तीन पावांचा हिशेब न लागल्याने कारागृहातील जेलर आणि पाच महिला कर्मचाऱ्यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मंजुळा शेट्येची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून नागपाडा पोलिसांनी तपास सुरू केला होता. या प्रकरणात राज्य महिला आयोगानेही दखल घेत चौकशी सुरू केली. तर, बुधवारी हा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष
३ कडे वर्ग केला आहे.
पुरावे नष्ट करण्यात आल्याची शक्यता
प्रभा राऊळ यांनी बुधवारी नागपाडा पोलीस ठाण्याला भेट दिली. हत्येच्या गुन्ह्यांसंदर्भातील माहिती, कागदपत्रे त्यांच्याकडे देण्यात आली आहेत. मंजुळाच्या हत्येनंतर तेथील पुरावे नष्ट करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यादृष्टीनेही गुन्हे शाखा शोध घेत आहे.
पडसलगीकर यांचे आदेश-
पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या आदेशानुसार समाजसेवा शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रभा राऊळ या गुन्हे शाखेच्या वतीने हे प्रकरण हाताळणार आहेत. राऊळ यापूर्वी महिला अत्याचारविरोधी सेलमध्ये काम करीत होत्या. त्यांची नुकतीच समाजसेवा शाखेत बदली झाली. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त के.एम. प्रसन्ना यांनी याबाबत तपास करण्याचे आदेशपत्र त्यांना दिले आहे.

Web Title: CID inquiry of prisoner's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.