नेरुळ हत्या प्रकरणाची CIDमार्फत चौकशी व्हावी - आठवले

By Admin | Published: July 23, 2016 12:56 PM2016-07-23T12:56:33+5:302016-07-23T12:58:07+5:30

नेरुळमधील स्वप्नील सोनावणे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे द्यावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली

CID probe into Nerul killing case - Athawale | नेरुळ हत्या प्रकरणाची CIDमार्फत चौकशी व्हावी - आठवले

नेरुळ हत्या प्रकरणाची CIDमार्फत चौकशी व्हावी - आठवले

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी मुंबई, दि. २३ -  नेरुळमधील स्वप्नील सोनावणे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे द्यावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. शनिवारी त्यांनी पीडित सोनावणे कुटुंबियांची भेट घेतली.

नेरूळ मधील दलित हत्याकांड ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना असल्याची देखील भावना व्यक्त करतानाच दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरदेखील गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आठवले यांनी केली. 

यावेळी त्यांनी नगर जिल्ह्यातील कोपरर्डी बलात्कार प्रकरणीही दु:ख व्यक्त केले. कोपर्डी अत्याचार प्रकरण हे दुर्दैवी असून तेथील पीडित कुटुंबास भेटण्यास आपल्याला केलेला मज्जाव हा चुकीचा असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात मी दलित-मराठा असा भेदभाव मी करत नाही, अत्याचार हा अत्याचार असतो असे लांगत आपण उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट असल्याचे आठवले यांनी नमूद केले. 

 

Web Title: CID probe into Nerul killing case - Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.