सिडकोच्या भूखंडाला मिळाला विक्रमी भाव

By admin | Published: June 3, 2016 03:42 AM2016-06-03T03:42:42+5:302016-06-03T03:42:42+5:30

सानपाडा येथील सिडकोच्या भूखंडाला रेकॉर्ड ब्रेक दर प्राप्त झाला आहे. हा भूखंड ३ लाख ३९ हजार ३३९ रुपये प्रति चौरस मीटर दराने विकला गेला आहे.

CIDCO's plot to get a record; | सिडकोच्या भूखंडाला मिळाला विक्रमी भाव

सिडकोच्या भूखंडाला मिळाला विक्रमी भाव

Next

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
सानपाडा येथील सिडकोच्या भूखंडाला रेकॉर्ड ब्रेक दर प्राप्त झाला आहे. हा भूखंड ३ लाख ३९ हजार ३३९ रुपये प्रति चौरस मीटर दराने विकला गेला आहे. सिडकोच्या इतिहासातील हा सर्वोच्च दर मानला जात आहे. सिडकोने नेरूळ व सानपाडा येथील भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या. यातून सिडकोच्या तिजोरीत तब्बल ३१९ कोटी रुपयांची भर पडली आहे.
सानपाडा सेक्टर १३ येथील ३0५0 चौरस मीटर भूखंडाला प्रति चौरस मीटर ३ लाख ३९ हजार ३३९ रुपये इतका दर मिळाला आहे. निवास्ती डेव्हलपर्सने ही बोली लावली होती.
५१२२ चौरस मीटरच्या आणखी एका भूखंडाला प्रति चौरस मीटर ३ लाख ७ हजार ५५५ रुपये इतका दर मिळाला आहे.

Web Title: CIDCO's plot to get a record;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.