एमआयडीसीत लागले सीसीटीव्ही
By Admin | Published: August 6, 2016 01:43 AM2016-08-06T01:43:58+5:302016-08-06T01:43:58+5:30
अंधेरी (पूर्व) येथील सीप्झ -एमआयडीसी परिसरात १६0 सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोफत वायफायची सुविधा जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली
मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील सीप्झ -एमआयडीसी परिसरात १६0 सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोफत वायफायची सुविधा जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी अंधेरी (पूर्व) येथील महत्त्वाच्या १६७ रस्त्यांवर हे सीसीटीव्हींचे जाळे उभारण्यात आले आहे. तसेच १४४ कॅमेऱ्यांद्वारे लहान बोळांवरही लक्ष ठेवण्यात येईल. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष विविध पोलीस चौक्यांमध्ये आहेत. सर्व कॅमेरे अत्याधुनिक असून रात्रीही छायाचित्रे आणि आवाज स्पष्टपणे टिपतात. जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक ७३ च्या नगरसेविका केसरबेन मुरजी पटेल यांनी अंधेरी नागरिकांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शनिवारी होली फॅमिली हायस्कूल, महाकाली रोड येथे आयोजित केला आहे. या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन तसेच दहावीच्या परीक्षेत ९0 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या ५00 विद्यार्थ्यांचा टॅब देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तर विभागातील पहिल्या तीन मुलांना लॅपटॉप देण्यात येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते हे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित साटम उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)