चित्रपटसंग्रहालयाचे पी. के. नायर यांचे निधन

By admin | Published: March 5, 2016 03:57 AM2016-03-05T03:57:19+5:302016-03-05T03:57:19+5:30

चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले आणि ‘सॅल्युलाईड मॅन’ अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी. के. नायर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले.

Cinema hall p. Of Nair passed away | चित्रपटसंग्रहालयाचे पी. के. नायर यांचे निधन

चित्रपटसंग्रहालयाचे पी. के. नायर यांचे निधन

Next

पुणे : चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले आणि ‘सॅल्युलाईड मॅन’ अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी. के. नायर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या आठवडाभरापासून आजारी असल्यामुळे नायर यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एनएफएआयच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’ ‘बॉम्बे टॉकीज’ यांसारख्या अनेक जुन्या चित्रपटांसह ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांसारखे काही दर्जेदार पण अडगळीत पडलेले चित्रपटही शोधून काढत त्यांनी ते जतन करण्याची मोलाची कामगिरी बजावली. चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चित्रपटविषयक साक्षरता निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
परमेश कृष्णन नायर यांचा जन्म ६ एप्रिल १९३३ रोजी केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे झाला. उमेदीच्या काळात त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली. तसेच काही पुस्तकांचे लेखनही केले.
फिल्म इन्स्टिट्यूटटची १९६१ साली स्थापना झाली. तेव्हापासून नायर यांनी ग्रंथपाल म्हणून काम पाहिले. आपल्या कारकिर्दीच्या काळात अनेक पदे भूषवीत ‘एनएफएआय’ च्या संचालकपदापर्यंत ते पोहोचले. १९६४ साली स्थापन झालेल्या नॅशनल फिल्म अर्काईव्ह आॅफ इंडिया’ चे (एनएफएआय) पहिले संचालक होण्याचा मान त्यांना मिळाला. १९९१ साली ते या संस्थेतून संचालक पदावरून निवृत्त झाले होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Cinema hall p. Of Nair passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.