भारतातील धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी सर्किट ट्रेन

By admin | Published: February 25, 2016 05:38 PM2016-02-25T17:38:50+5:302016-02-25T17:38:50+5:30

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या यात्रेकरुंसाठी विशेष आस्था सर्किट ट्रेनची घोषणा केली आहे.

Circuit train to connect religious sites in India | भारतातील धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी सर्किट ट्रेन

भारतातील धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी सर्किट ट्रेन

Next
>नवी दिल्ली- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या यात्रेकरुंसाठी विशेष आस्था सर्किट ट्रेनची घोषणा केली आहे. अजमेर, अमृतसर, बिहार शरीफ, चेंगनूर, द्वारका, गया, हरिद्वार, मथुरा, नागपद्धटनम, नांदेड, नसिक, पाली, पारसनाथ, पुरी, तिरुपति, वेलंकन्नी, वाराणसी, वास्को यासारख्या महत्वपूर्ण धार्मिक ठिकाणास रेल्वेने जोडले जाण्यासाठी ‘आस्था सर्किट’ सुरु करण्यात येणार आहे. 
 
या आस्था ट्रेनचा फायदा राज्यातील धार्मिक स्थळांना होण्याची शक्यता आहे. या तिन्ही स्पेशल आस्था सर्किट ट्रेनमुळे पर्यटन व्यवसायालाही फायदा होणार आहे. त्यामुळे जी ठिकाणे विशेष आस्था सर्किट ट्रेनच्या मॅपवर येतील त्यांना त्याचा फायदा होऊन राज्यातील रोजगारांच्या संधी वाढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Circuit train to connect religious sites in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.