‘देशपातळीवरील अभियांत्रिकी सीईटीला राज्याचा पाठिंबा’
By admin | Published: April 30, 2017 03:27 AM2017-04-30T03:27:04+5:302017-04-30T03:27:04+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्याच धर्तीवर अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी देशपातळीवर
मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्याच धर्तीवर अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी देशपातळीवर एकच सामाईक सीईटी घेण्याच्या निर्णयाला राज्याचा पाठिंबा आहे. एकच प्रवेश परीक्षा घेतल्यास अनेक परीक्षांमधून विद्यार्थ्यांची सुटका होईल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी व्यक्त केला.
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी नीट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर अभियांत्रिकीच्या प्रवेशांमधील पारदर्शकतेसाठी देशपातळीवर एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केले. यानंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) जबाबदारी देण्यात आली. ही परीक्षा २०१८ पासून घेण्याची घोषणा करण्यात आली. पण, या निर्णयाला काही राज्यांनी विरोध केला आहे. मात्र, महाराष्ट्र या परीक्षेला विरोध करणार नाही. याप्रकरणी केंद्राशी बोलणी सुरू असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)