निवडणुकीच्या काळात नागरिक ‘गॅस’वर

By admin | Published: February 11, 2017 02:23 AM2017-02-11T02:23:10+5:302017-02-11T02:23:10+5:30

गेल्या आठवड्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिक्रापूर येथील एलपीजी गॅस सिलिंडर कंपनीकडून शहरात गॅस सिलिंडरचे वितरण होते.

Citizens 'gas' during elections | निवडणुकीच्या काळात नागरिक ‘गॅस’वर

निवडणुकीच्या काळात नागरिक ‘गॅस’वर

Next

पिंपरी : गेल्या आठवड्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिक्रापूर येथील एलपीजी गॅस सिलिंडर कंपनीकडून शहरात गॅस सिलिंडरचे वितरण होते. मात्र, गॅस भरण्याच्या प्रक्रियेत बिघाड निर्माण झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात गॅस सिलिंडरचे वितरण होत नसल्याचे शहरात टंचाई आहे.
ऐन निवडणुकीच्या कालावधीत सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे प्रचार, मतदारांच्या गाठीभेटी, पक्षाची इतर कामे करत असतानाच घरातील सिलिंडर संपल्याने अधिकच तारांबळ उडत आहे. पर्यायी मार्ग शोधण्यासाठी ग्राहकांना भटकंती करावी लागत आहे. पर्यायी इंधनाचा वापर करावा लागत आहे.
आॅनलाइन सिलिंडर नोंदविल्यानंतर दोन ते तीन दिवसांत गॅस घरपोच मिळतो. मात्र, गेल्या आठवड्यापासून नोंदणी करून देखील सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
याबाबत गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता, तेथील कर्मचाऱ्याने सांगितले की, शिक्रापूर येथील सिलिंडर वितरण कंपनीमध्ये गॅस भरण्याच्या प्रक्रियेत बिघाड निर्माण झाला आहे. तोदुरुस्त झाल्यानंतर पूर्ववत वितरण होईल.’’
मागणी नोंदविल्यानंतर चार-पाच दिवस सिलिंडरची डिलिव्हरी द्यायची असा कंपनीचा आदेश आहे. बुकिंगनंतर डिलिव्हरी होत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. बिघाड होण्याआधी प्रतिदिन एजन्सीकडून ग्राहकांना ४०० सिलिंडरचे वितरण होत असते. परंतु कंपनीकडून पुरेसा माल येत नसल्याने प्रतीक्षायादी वाढली आहे. बऱ्याच ग्राहकांना पूर्वकल्पना नसल्याने थेट एजन्सीमध्ये जाऊन चौकशी करावी लागत आहे.
अनेकवेळा सिलिंडर घरी आल्यावर पावतीवर दर्शविलेल्या किंमतीपेक्षा जास्त रक्कमेची
मागणी केली जाते. याबाबत विचारणा केली असता उंच इमारत असल्याने वर चढविण्यास कंपनी खर्च देत नसल्याचे कारण सांगितले जाते. गेल्या १५ दिवसांपासून
पिंपरी, मासूळकर कॉलनी, नेहरूनगर, चिंचवड, निगडी, काळेवाडी,
थेरगाव, प्राधिकरण परिसरात
घरगुती सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Citizens 'gas' during elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.