शहर स्वच्छता अभियानाचा ‘बुमरँग’

By admin | Published: September 5, 2014 12:39 AM2014-09-05T00:39:02+5:302014-09-05T00:39:02+5:30

महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या लोकनेते यशवंतराव चव्हाण स्वच्छता अभियानामुळेच शहरात काही प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असल्याची बाब समोर येत आहे.

City cleanliness campaign 'Boomrang' | शहर स्वच्छता अभियानाचा ‘बुमरँग’

शहर स्वच्छता अभियानाचा ‘बुमरँग’

Next
पुणो : शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरणाची शिस्त लागावी तसेच लोकसहभागातून शहर स्वच्छ राहावे, या उद्देशाने महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या लोकनेते यशवंतराव चव्हाण  स्वच्छता अभियानामुळेच शहरात काही प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असल्याची बाब समोर येत आहे. या अभियानात क्रमांक मिळाल्यास प्रभागासाठी कोटय़ावधीचा निधी मिळत असल्याने या स्पर्धेसाठी नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कोणतीही पर्यायी सुविधा न देता, शेकडो कचरा कंटेनर काढण्यात आले आहेत. परिणामी नागरिक जागा मिळेल तिथे रात्रीच्या अंधारात जागा मिळेल तिथे कचरा टाकत आहेत. अभियानापूर्वी शहरात सुमारे 1017 कंटनेर होते. तर या अभियानात दोन वर्षात त्यांची संख्या 847 आणण्यात आली आहे.
राज्यशासनाच्या संत गाडगेमहाराज ग्राम स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पुणो शहरातही प्रभागांमध्ये नागरिकांच्या सहभागाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तत्कालीन महापौर वैशाली बनकर यांच्या पुढाकाराने हे अभियान सुरू करण्यात आले. त्याता प्रमुख उद्देश शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरणाची शिस्त लावणो तसेच शहरातील कचरा कंटेनरची संख्या कमी करून जास्तीत जास्त नागरिकांनी वर्गीकरण केलेला कचरा महापालिकेच्या घंटागाडी मध्ये देणो परिणामी कचरा वर्गीकरणही वाढेल आणि त्यावर प्रक्रिया करणोही सोपे जाईल असा होता. या अभियानासाठी दोन कोटींपासून 75 लाखांर्पयत बक्षिसही ठेवण्यात आले. मात्र, आता या अभियानाचा उलटाच परिणाम होत असल्याचे महापालिकेच्या नुकत्याच शहरात घाणींच्या ठिकाणांचे केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशी घाण असलेली तब्बल 800 ठिकाणो शहरात आढळून आली असली तरी, त्यातील सुमारे 20 टक्के ठिकाणी या अभियानासाठी कचरा कंटेनर काढून घेतलेल्या ठिकाणची आहेत. 
कंटेनर काढला मात्र, कचरा टाकण्याची सुविधाच दिली नाही लोकसहभागासाठी असलेला लोकांचा सहभागच या अभियानातून गायब होऊन केवळ कंटेनर कमी करणो हा एकमेव उददीष्ट या अभियानाचे बनले आहे. त्या अंतर्गत या अभियानाची जबाबदारी असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांकडून कचरा कंटेनर कमी करण्याचा धडाका सुरू करण्यात आला आहे. हे कं़टेनर काढून घेण्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयांकडून नागरिकांना काहीच माहिती दिली जात नाही. तसेच कंटेनर काढून घेताना, त्या भागात महापालिकेचे कचरा वेचक, तसेच कचरा संकलीत करण्यासाठी येणारी घंटागाडी कधी येईल. याची कोणतीही कल्पना दिली जात नाही. त्यामुळे नागरिक काही दिवस घरातच कचरा साठवतात, आणि पर्याय नसल्याने वाढलेला कचरा रात्रीच्या अंधारात पुन्हा कंटेनर काढून घेतलेल्या जागी अथवा रिकामी जागा मिळेल तिथे टाकतात.  
 
4महापालिकेकडून कचरा कंटेनर कमी केल्यानंतर त्यांच्या परिसरात येणा:या घंटागाडय़ाचे वेळापत्रक क्षेत्रीय कार्यालयाकडून देणो आवश्यक आहे. तसेच, त्या गाडय़ा नियमित येतील, याची खबरदारीही घेणो आवश्यक आहे. मात्र, काही क्षेत्रीय कार्यालये वगळता शहरात कोठेही ही माहिती नागरिकांना वेळोवेळी उपलब्ध करून दिली जात नाही. 
4तसेच या गाडय़ा नियमित आल्या, तरी त्यांची येण्याची वेळ निश्चित नसते. त्यामुळे नागरिकांचा कचरा साठतो आणि ते जागा मिळेल, तिथे तो टाकतात. त्यामुळे महापालिकेनेच प्रभागनिहाय या गाडय़ांचा मार्ग, त्याची निश्चित वेळ, नागरिकांर्पयत पोहचविणो आवश्यक आहे. 

 

Web Title: City cleanliness campaign 'Boomrang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.