शहरात कच:याची घुसमट

By admin | Published: August 7, 2014 11:28 PM2014-08-07T23:28:55+5:302014-08-07T23:28:55+5:30

उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी कच:याच्या गाडय़ा अडविल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुमारे दीड हजार टन कचरा पडून आहे.

In the city: its intrusion | शहरात कच:याची घुसमट

शहरात कच:याची घुसमट

Next
>पुणो : उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी कच:याच्या गाडय़ा अडविल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुमारे दीड हजार टन कचरा पडून आहे. आज दिवसभरात महापालिकेकडून रोकेम, दिशा आणि अजिंक्य प्रकल्पांसह शहरातील बायोगॅस प्रकल्पांमध्ये सुमारे 6क्क् टन कच:यावर प्रक्रिया केली असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
   बुधवारपासूनच ग्रामस्थांनी गाडय़ा येऊ देण्यास बंदी घातल्याने महापालिकेकडून डेपोवर आज एकही गाडी पाठविण्यात आली नाही. तर, अनेक ठिकाणी कुंडय़ांमध्ये साचलेला कचरा या गाडय़ांमध्ये भरून, या गाडय़ा कचरा हस्तांतरण केंद्रावर थांबविण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज रामटेकडी येथील मिश्र कच:यावर प्रक्रिया करणा:या रोकेम प्रकल्पात 3क्क् टन, तर दिशा आणि अजिंक्य प्रकल्पात 2क्क् टन ओला कचरा आणि पालिकेच्या बायोगॅस प्रकल्पांमध्ये सुमारे 6क् ते 8क् टन ओला कचरा प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
           (प्रतिनिधी)
 
पाऊस थांबल्याने दिलासा 
शहरात कचरा साठल्यानंतर तो पावसात भिजल्यास त्याचे वजन वाढते. तसेच, त्यात ओला कचरा असल्यास रोगराई, डासांचा प्रादुर्भाव; तसेच दरुगधीही वाढण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणात वाढते. शहरात आंदोलनामुळे सुमारे दीड हजार टन कचरा पडून असला तरी, आज सकाळपासून पावसाने विश्रंती घेतल्याने महापालिकेस दिलासा मिळाला आहे. मात्र, हे कच:याचे प्रमाण वाढत गेल्यास; तसेच पाऊसही वाढल्यास शहरात आरोग्याची स्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: In the city: its intrusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.