वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ११५ जणांवर शहर पोलीसांची धडक कारवाई

By अनिल गवई | Published: March 2, 2023 05:33 PM2023-03-02T17:33:30+5:302023-03-02T17:33:30+5:30

वाहतुकीचे नियम मोडणार्यांसह शहर पोलीसांनी रस्त्यावर वाहने उभी करणार्या ११५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

City police crack down on 115 people who violate traffic rules | वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ११५ जणांवर शहर पोलीसांची धडक कारवाई

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ११५ जणांवर शहर पोलीसांची धडक कारवाई

googlenewsNext

खामगाव:

वाहतुकीचे नियम मोडणार्यांसह शहर पोलीसांनी रस्त्यावर वाहने उभी करणार्या ११५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर १० जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गत दोन दिवसांत शहर वाहतूक शाखेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे बेशिस्त वाहन धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील स्वत: प्रयत्नशील आहेत. दरम्यान, २८ फेब्रुवारीच्या सायंकाळपासून गुरूवारी दुपारपर्यंत दोन दिवसात पोलिसांनी तब्बल ११५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या अंतर्गत ६ जणांवर कलम २८३ प्रमाणे ४ जणांवर १०२ प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर शहर वाहतूक शाखेकडून शहरातील रस्त्यावर बेशीस्त वाहने उभी करणार्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील बेशिस्त वाहनधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. दरम्यान, शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु असून नागरिकांनी यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. सर्वांनी | वाहतूकीचे नियम पाळणे गरजेचे असून रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही यांनी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बेशीस्त वाहनधारक पोलीसांच्या रडारवर
रहदारीस अडथळा निर्माण करणे, रस्त्यावर वाहने लावणे, विनानंबर गाडया चालविणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, ट्रिपल सिट दुचाकी चालविणे अशा वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. सामान्य नागरिकांसोबतच पॐेरीवाले, विक्रेते यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा पोलीस प्रशासनाकडून नियमित दंडात्मक कारवाई केली जाईल.
शांतीकुमार पाटील
पोलीस निरिक्षक, खामगाव शहर

Web Title: City police crack down on 115 people who violate traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.