नगरच्या कांदा व्यापाऱ्याला ७७ लाखांना फसविले
By admin | Published: March 6, 2016 03:44 AM2016-03-06T03:44:24+5:302016-03-06T03:44:24+5:30
व्यापाऱ्याने मागणी केल्याप्रमाणे अडीचशे टन कांदा पाठविला़ मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे पाच कांदा व्यापाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला़
अहमदनगर : व्यापाऱ्याने मागणी केल्याप्रमाणे अडीचशे टन कांदा पाठविला़ मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे पाच कांदा व्यापाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला़
सारसनगर येथील कांदा व्यापारी बबन निवृत्ती घुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कांदा व्यापारी एम़ के. अब्दुल, इक्बाल मोहम्मद ईस्माईल, मोहम्मद ईस्माईल, के. जी़ जयेश (सर्व रा. टेंपल गेट तलचोरी. जि. कन्नुर, केरळ), राहुल भगत (पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे़ सदर व्यापाऱ्यांनी येथील व्यापारी घुले यांना कांदा पाठविण्यास सांगितले होते़ त्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर २०१३, या काळात घुले यांनी ७७ लाख ५० हजार रुपये किमतीचा २५० टन कांदा पाठविला़ पाठविलेल्या कांद्याचे पैसे मात्र त्यांना मिळाले नाहीत़ प्रतीक्षा करूनही पैसे न मिळाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)