स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाच घेताना पकडले

By Admin | Published: November 15, 2016 08:47 PM2016-11-15T20:47:20+5:302016-11-15T20:47:20+5:30

लोणार पंचायत समिती येथे कार्यरत असलेले स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विजय गोपीनाथ राठोड यांना लाचलूचपत विभागाने सापळा रचून मंगळवारी १५०० रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

Civil engineering assistant was caught taking bribe | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाच घेताना पकडले

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाच घेताना पकडले

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
लोणार (बुलडाणा), दि. 15 - लोणार पंचायत समिती येथे कार्यरत असलेले स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विजय गोपीनाथ राठोड यांना लाचलूचपत विभागाने सापळा रचून मंगळवारी  १५०० रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
किनगावजट्टू येथील अकबर शहा जम्मन शहा यांच्या शौचालय अनुदानाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी ५०० रुपये व तेजराव आनंदा गवई यांच्या रमाई घरकुल योजनेत मंजूर झालेल्या घरकुलाचा दुसरा धनादेश काढून दिला म्हणून १०००
रुपये, असे एकूण १५०० रुपये लाचेची मागणी स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक विजय राठोड करत असल्याची तक्रार किनगावजट्टू येथील संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष राजेश उर्फ यादवराव सखाराम नागरे यांनी बुलडाणा लाच लूचपत विभागाकडे केली होती. तक्रारीवरुन १५ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी कार्यवाही करण्यात आली. यावेळी पडताळणीदरम्यान विजय राठोड यांनी १५०० रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर सापळा रचून कार्यवाही केली असता, विजय गोपीनाथ राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडून लोणार पंचायत समिती कार्यालयामध्ये लाचेची रक्कम १५०० रुपये पंचासमक्ष स्वीकारले. याप्रकरणी विजय राठोड विरुद्ध कलम ७, १३
(१) (ड) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
 सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक महेश चिमटे, अप्पर पोलिस अधिक्षक विलास देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक विलास पाटील, एएसआय शाम भांगे, पोहेकॉ रविंद्र लवंगे, पो.ना.संजय शेळके, सुखदेव ठाकरे, पो.कॉ.
विजय वारुळे, संतोष यादव यांनी पार पाडली.                      

Web Title: Civil engineering assistant was caught taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.