मुंबईत 10 जागांवर ‘रिपाइं’चा दावा
By Admin | Published: August 5, 2014 03:40 AM2014-08-05T03:40:27+5:302014-08-05T03:40:27+5:30
मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 1क् जागा रिपब्लिकन पक्षाला मिळायला हव्यात, अशी आग्रही भूमिका रिपब्लिकन पक्षाने घेतली आहे.
मुंबई : मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 1क् जागा रिपब्लिकन पक्षाला मिळायला हव्यात, अशी आग्रही भूमिका रिपब्लिकन पक्षाने घेतली आहे. या 1क् जागांची यादीदेखील महायुतीतील अन्य पक्षांना सादर करण्यात आली आहे.
रिपाइंने राज्यभरातील 57 जागांची यादी महायुतीसमोर ठेवली. यातील किमान 2क् जागा मिळाव्यात, असा आग्रहही पक्षाने धरला. यात मुंबईतील 1क् जागांचा समावेश
आहे. मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात दलित मतदार असून, काही ठिकाणी ही मते निर्णायक असल्याचा पक्षाचा दावा आहे. कुर्ला (राखीव), चेंबूर, विक्रोळी, वर्सोवा, चांदिवली, शिवाजीनगर- मानखुर्द, अणुशक्तीनगर, धारावी, कुलाबा व भांडुप या 1क् जागांवर रिपाइंने दावा केला. कुर्ला, मानखुर्द, चेंबूर व अणुशक्तीनगर या जागांसाठी पक्षाचा आग्रह आहे.
2क्क्9च्या निवडणुकीत रिपाइंने 8 जागा लढविल्या. यातील एकाही जागेवर विजय मिळाला नाही. 12 ऑगस्ट रोजी राजधानी नवी दिल्लीत रिपाइंच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली
आहे. रेल्वे भवनजवळील मावळंणकर सभागृहात होणा:या या बैठकीस पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले मार्गदर्शन करतील. या वेळी पक्षाच्या उत्तर भारतातील कार्यकत्र्याचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)