दापोडीत जलसंपदा कर्मचाऱ्यांची निदर्शने
By admin | Published: June 28, 2016 01:49 AM2016-06-28T01:49:23+5:302016-06-28T01:49:23+5:30
कार्यकारी अभियंता विभाग बंद, आकृतिबंध आदी मागण्यांच्या विषयावर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून प्रशासनाकडे निषेध नोंदविला.
पिंपळे गुरव : दापोडी येथील जलसंपदा विभागामध्ये कर्मचारी कपात, कार्यकारी अभियंता विभाग बंद, आकृतिबंध आदी मागण्यांच्या विषयावर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून प्रशासनाकडे निषेध नोंदविला.
जलसंपदा विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या मान्य करण्यासाठी निदर्शने केली. त्यामध्ये कार्यकारी अभियंता विभाग बंद करणार असल्याने कामामधील सुसूत्रता अधिक जटिल होणार आहे. तसेच कर्मचारी कपातीमुळे कामाचा ताण वाढणार आहे. आकृतिबंध असल्याने पूर्वीच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे प्रशासनाने मागण्यांसाठी निदर्शने केली.
कल्याण महासंघाचे प्रवीण धिवार, श्रमिक संघटनेचे अध्यक्ष दिनकर इंगळे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. सफाई कामगार अध्यक्ष यशवंत गोयर, दापोडी बचाव समितीचे अध्यक्ष संजय पाटील,
कृती समिती अध्यक्ष कैलास
पवार, प्रकाश भालेराव, दत्तू गायकवाड, सुरेश कैर, दीपक टेमगिरे, दत्ता दिवेकर, रोहिणी वाघमारे, माधुरी देवरे, अरुणा कोरे आदींनी आंदोलनात भाग घेतला. (वार्ताहर)