VIDEO : उल्हासनगरात वाहतूक पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 07:41 PM2018-02-11T19:41:31+5:302018-02-11T19:47:05+5:30
उल्हासनगरातील १७ सेक्शन येथील नो पार्किंग मधिल मोटार सायकल उचलल्यावरून, वाहतूक पोलीस व ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली.
उल्हासनगर - १७ सेक्शन येथील नो पार्किंग मधिल मोटार सायकल उचलल्यावरून, वाहतूक पोलीस व ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित ज्येष्ठ नागरिकांना मध्यवर्ती रुग्णालनात दाखल केले. यापूर्वीही वाहतूक पोलिसाला मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, १७ सेक्शन परिसरातील विना पार्किंग भागात जवाहर वासुदेव लुल्ला-६७ यांनी अॅक्टीवा मोटारसायकल उभी केली होती. दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यांन वाहतून पोलिसाच्या टोईंग गाडीवरील वार्डन व पोलिसांनी त्यांची गाडी उचलली. तेंव्हा जवाहर लुल्ला यांनी उचलली गाडी खाली उतरण्यास सांगितले. मात्र वाहतूक पोलीस बी के पाटील व त्याचे कर्मचा-यानी दुर्लक्ष करून गाडी सुरू केली. तेंव्हा लुल्ला यांनी गाडीला पकडत वाहतूक पोलीसांना गाडी थांबविण्यास मजबूर केले. दोघांच्या झोंबाझोबीत वाहतूक पोलिस पाटील यांनी लुल्ला यांच्या कानशिलात मारली. तर लुल्ला यांनीही पाटील यांना मारहाण केली.
शहरात वाहतूक पोलीसांना मारहाणीचे प्रकार अनेकदा झाले असून भिती पोटी वाहतूक पोलिस टोर्इंग गाडीवर जाण्यास नकार देत आहेत. असी परिस्थिती शहरात निर्माण झाली. वाहतूक पोलिस बी के पाटील यांनी तक्रार करण्यासाठी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात धाव घेतली. तर जवाहर लुल्ला यांनी रक्तदाब वाढल्याने, त्यांना मध्यवर्ती रूग्णालयात भरती केले. आयसीयु विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वृध्दाला मारहाण झाल्या बाबत, व्यापा-ंयानी संताप व्यक्त होत करून वाहतुक पोलिसांसह टोंईग गाडीवरील कर्मचा-यांवर कारवाईची मागणी केली. दुसरीकडे कायदयानुसार कारवाई करावी कि नाही?. असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे.