कर्जमाफीचे ४ हजार कोटी बँकांकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:53 AM2017-12-05T05:53:55+5:302017-12-05T05:54:11+5:30
राज्यातील आतापर्यंत पात्र ७ लाख ७८ हजार शेतक-यांचे कर्ज माफ करण्यासाठी ४ हजार कोटी रुपये बँकांकडे वर्ग केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.
उस्मानाबाद : राज्यातील आतापर्यंत पात्र ७ लाख ७८ हजार शेतक-यांचे कर्ज माफ करण्यासाठी ४ हजार कोटी रुपये बँकांकडे वर्ग केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. कर्जमाफीच्या अर्जांची छाननी अजूनही सुरूच आहे़ ही खूप मोठी प्रक्रिया आहे़ डिसेंबर अखेरपर्यंत ६० ते ७० टक्के पात्र शेतक-यांना माफीचा लाभ मिळेल़ मात्र, प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल, हे निश्चित सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकºयांच्या सोयीसाठी नियमांत बरेचसे बदल करण्यात आले आहेत़ शेतकºयांचा माल निश्चितच खरेदी केला जाईल़ त्यांनी थोडा संयम ठेवावा. मागच्या सरकारात ही केंद्रे कुठे अन् कशी चालत होती, याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे़ तुलनेने आमचे सरकार खरेदीत पारदर्शकता आणून शेतकºयांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे़ त्रुटी आढळणाºया केंद्राची माहिती घेऊन चुका तातडीने दूर केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली़..