दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

By Admin | Published: March 9, 2016 06:14 AM2016-03-09T06:14:22+5:302016-03-09T06:14:22+5:30

नागपूर येथील दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावास त्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.

'A' class tourist destination status of 'D' | दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

googlenewsNext

मुंबई : नागपूर येथील दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावास त्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा याच ठिकाणी घेतली. त्यानंतर गेली ६० वर्षे हे स्थळ जगभरातील बौद्धधर्मियांसाठी श्रद्धास्थळ बनले आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य स्तुपाचेही आकर्षण आहे. डॉ.आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षात दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचे औचित्य साधण्यात आले आहे.
यापूर्वी दीक्षाभूमीस पर्यटन स्थळ म्हणून ‘क’ दर्जा होता. मात्र, गेल्या वर्षी भारतरत्न आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता कार्यवाहीला वेग दिला आहे. त्यानुसार, पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यास मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे दीक्षाभूमीचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 'A' class tourist destination status of 'D'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.