वेळापत्रकानुसारच दहावी, बारावीच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 02:47 AM2017-02-09T02:47:47+5:302017-02-09T02:47:47+5:30

राज्यभरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे.

Class XII, HSC exams on schedule | वेळापत्रकानुसारच दहावी, बारावीच्या परीक्षा

वेळापत्रकानुसारच दहावी, बारावीच्या परीक्षा

googlenewsNext

मुंबई : राज्यभरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. या अफवेच्या पार्श्वभूमिवर दोन्ही परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार होणार असून, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा ही ठरलेल्या दिवशीच होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ८ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यात वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत, तर लेखी परीक्षा २८ फेब्रुवारीला सुरू होणार असून, २५ मार्च रोजी संपणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणापत्र (दहावी) परीक्षा प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान होणार आहेत. त्याचबरोबर, दहावीची लेखी परीक्षा ७ मार्चला सुरू होणार असून, १ एप्रिलला संपणार आहे. राज्यातील महापालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच कालावधीत होणार आहेत. काही शिक्षकांना निवडणुकांचे काम दिले आहे, पण याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम दहावी, बारावीच्या परीक्षांवर होणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Class XII, HSC exams on schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.