बारावीचा गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2017 01:51 PM2017-03-06T13:51:50+5:302017-03-06T13:52:40+5:30

बारावीचे पेपरफुटीचे प्रकरण सुरूच आहे. मराठी, एस.पी. विषयांपाठोपाठ सोमवारी गणित विषयाचा पेपरही व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला.

Class XII Mathematical Paper Viral on Social Media | बारावीचा गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

बारावीचा गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - बारावीचे पेपरफुटीचे प्रकरण सुरूच आहे. मराठी, एस.पी. विषयांपाठोपाठ सोमवारी गणित विषयाचा पेपरही व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गणिताचा पेपर व्हायरल झाला. 
 
याप्रकरणी वांद्रे येथील परीक्षा केंद्रातून एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. 
शिवाय, वाशी पोलीस स्टेशनमध्येही याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात येणार आहे.  
(SBI मध्ये खातं असेल तर ही बातमी नक्की वाचा)
 
दरम्यान 2 मार्च रोजी मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसंच बारावीच्या इतर काही विद्यार्थ्यांची चौकशी सुरू झाली आहे.
 

2 मार्च रोजी परीक्षेच्या 15 मिनिटे अगोदर मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परीक्षेचा 10 मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पेपर दिला जातो. यादरम्यान त्यांना मोबाइल अथवा इंटरनेट वापराला बंदी आहे, तरीही तो व्हॉट्सअपवर शेअर झाल्याची तक्रार बोर्डातर्फे वाशी पोलिसांकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राहुल भास्कर (२२) व अझरुद्दीन शेख (२०) अशी त्यांची नावे असून दोघेही मालाडचे रहिवासी आहेत. 

Web Title: Class XII Mathematical Paper Viral on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.