दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा जुलैमध्येच!
By admin | Published: April 23, 2016 03:54 AM2016-04-23T03:54:10+5:302016-04-23T03:54:10+5:30
दहावी-बारावीची आॅक्टोबरमध्ये होणारी पुरवणी परीक्षा आता जुलै-आॅगस्टमध्येच होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केले
पुणे : दहावी-बारावीची आॅक्टोबरमध्ये होणारी पुरवणी परीक्षा आता जुलै-आॅगस्टमध्येच होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केले. त्यामुळे यंदा दहावीबरोबरच बारावीच्या परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुरवणी परीक्षा देता येणार आहे.
राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबरच पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ठ होणारे, तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणारे विद्यार्थी यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-आॅक्टोबर ऐवजी जुलै-आॅगस्ट मध्ये घेतली जाणार आहे. यापुढे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुणार पाटील यांनी म्हटले आहे.