‘बसगाड्या पाण्याऐवजी झाडूने स्वच्छ करा’

By admin | Published: March 31, 2016 02:06 AM2016-03-31T02:06:48+5:302016-03-31T02:06:48+5:30

राज्यात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी एसटी महामंडळाने आगार, बसस्थानकांसह एसटी कर्मचाऱ्यांना पाणी जपून वापरण्याच्या

'Clean with broom instead of bushes' | ‘बसगाड्या पाण्याऐवजी झाडूने स्वच्छ करा’

‘बसगाड्या पाण्याऐवजी झाडूने स्वच्छ करा’

Next

मुंबई : राज्यात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी एसटी महामंडळाने आगार, बसस्थानकांसह एसटी कर्मचाऱ्यांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, याचा फटका एसटीलाही बसला असून, बसगाड्या पाण्याऐवजी झाडूने स्वच्छ करण्याचे आदेशही दिले आहेत.
महाराष्ट्रात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात पाण्याची गरज लक्षात घेता, कित्येक ठिकाणी पाण्याची पातळी अत्यंत कमी होत जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आदेश एसटी महामंडळाने सर्व आगार, बस स्थानके व इतर प्रशासकीय कार्यालयांना दिले आहेत. पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणविरहित ठेवण्यात यावेत, आगार कक्षेतील बसस्थानके, उपहारगृहे, प्रसाधनगृहे येथील पाण्याचे नळ सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेतली जावी. चालक-वाहक विश्रांतीगृहे व एसटी बसगाड्या धुलाई यंत्रे येथील पाणी साठविण्याच्या टाक्या दररोज तपासून, पाण्याची गळती होत नसल्याची खात्री करून देण्याच्या आदेशाचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे, पाण्याची कमतरता असेल, अशा ठिकाणी एसटी बसगाड्या स्वच्छ झाडून काढाव्यात आणि फिनेलसारख्या द्रावणाचा पुरेशा प्रमाणामध्ये वापर करण्याचे आदेशही एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

टँकरमधील पाण्याचा वापर पिण्यासाठीच करा
काही आगारांमध्ये टँकरनेही पाणी पुरवठा केला जातो. अशा ठिकाणी टँकरमधील पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: 'Clean with broom instead of bushes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.