स्वच्छ भारत मिशनचा आता व्हॉट्सअप नंबर

By admin | Published: July 12, 2016 04:29 PM2016-07-12T16:29:45+5:302016-07-12T16:29:45+5:30

स्वच्छ भारत मिशनच्या वाशिम जिल्हा कक्षाच्या वतीने 8975767749 हा व्हॉट्सअप क्रमांक सुरु करण्यात आला

The Clean India Mission now has What's up number | स्वच्छ भारत मिशनचा आता व्हॉट्सअप नंबर

स्वच्छ भारत मिशनचा आता व्हॉट्सअप नंबर

Next

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 12-  स्वच्छ भारत मिशनच्या वाशिम जिल्हा कक्षाच्या वतीने 8975767749 हा व्हॉट्सअप क्रमांक सुरु करण्यात आला असुन याद्वारे स्वच्छतेविषयी चांगल्या उपक्रमांची आणि नागरीकांच्या तक्रारींचीही दखल तात्काळ घेतली
जाणार असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कायर्कारी अधिकारी महेश पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनल गती देण्यासाठी मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्यात नवनवीन उपक्रमांना सुरुवात केली असुन हा लोकांना अधिक चांगली सेवा देण्याच्या हेतुने स्वच्छ भारत मिशनचा व्हॉट्सअप क्रमांक सुरु करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना हा नंबर पंचायत समितीच्या दशर्नीय भागात प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील स्वच्छतेबाबतच्या यशोगाथांची माहिती जिल्हा कक्षाला त्वरीत मिळावी आणि लोकांच्या या अभियानाबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी या नंबरवर लेखी, छायाचित्र, रेकॉडिंग किंवा शुटींगच्या स्वरुपात टाकणे अपेक्षित आहे. या नंबरवर फोन न करता वरील स्वरुपातच नागरीकांनी संवाद करावा असे आवाहन महेश पाटील यांनी केले आहे.
सेल्फी विथ शौचालय..
आज ग्रामिण भागातही अ‍ॅण्ड्राईड मोबाईलचे फॅड एवढे वाढले आहे कि प्रत्येक घरी एखादा तरी असा मोबाईल पहायला मिळतो. त्यातच व्हॉटसअप मुळे संदेशाची देवाण-घेवाण खुपच जलद होत असल्याने हे माध्यम सर्व लोकांमध्ये पॉप्युलर झाले आहे. यामुळेच या माध्यमातुन लोकांना स्वच्छ भारत मिशनशी जोडुन घेण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक
करण्यासोबतच स्वच्छतेच्या या अभियानाशी संबंधित योग्य तक्रारीचीही दखल तात्काळ घेण्याचा प्रयत्न या माध्यमातुन करण्यात येणार आहे. लोकांनी शौचालय बांधुनही प्रोत्साहन अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यास त्यांनी मोबाईल मध्ये शौचालयासोबत सेल्फी (फोटो) काढुन स्वच्छ भारत मिशनच्या व्हॉट्स्अप नंबरवर टाकल्यास त्याची जिल्हास्तरावर तात्काळ दखल घेण्यात येईल.

Web Title: The Clean India Mission now has What's up number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.