स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा बोजवारा

By admin | Published: June 11, 2016 02:54 AM2016-06-11T02:54:18+5:302016-06-11T02:54:18+5:30

पनवेल नगरपरिषदेच्या वतीने वैयक्तिक वापरासाठी स्वच्छतागृहे उभारणाऱ्या रहिवाशांना निधी उपलब्ध करून दिला होता

Clean Maharashtra campaign will be destroyed | स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा बोजवारा

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा बोजवारा

Next

वैभव गायकर,

पनवेल- स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पनवेल नगरपरिषदेच्या वतीने वैयक्तिक वापरासाठी स्वच्छतागृहे उभारणाऱ्या रहिवाशांना निधी उपलब्ध करून दिला होता. पनवेल परिसरातील अनेक रहिवाशांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपरिषदेकडे निधीसाठी अर्ज केले होते. याअंतर्गत अनेकांनी स्वच्छतागृहांची बांधकामेही केली. परंतु या स्वच्छतागृहांना मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम रखडल्याने वापराविना ही स्वच्छतागृहे धूळखात पडून आहेत. एकूणच नगरपरिषदेच्या वेळकाढूपणामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा पनवेलमध्ये पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणाऱ्या नागरिकाला नगरपरिषदेच्या माध्यमातून २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. यातील ३ हजार नगरपरिषद, ५ हजार वित्त विभाग तर उर्वरित १२ हजार केंद्र शासनाकडून मिळणार आहे. शहराला हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या या उपक्र माला पनवेल नगरपरिषदेने या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला. याअंतर्गत नगरपरिषदेला अनेक अर्ज प्राप्त झाले. जवळपास ६०० पेक्षा अधिक लोकांनी या मोहिमेअंतर्गत स्वच्छतागृहांची बांधणी केली. परंतु यातील अनेक स्वच्छतागृहांना नगरपरिषदेकडून मलनि:सारण जोडण्या दिल्या गेल्या नाहीत. परिणामी ही स्वच्छतागृहे वापराविना पडून आहेत. याकरिता नागरिक सातत्याने नगरपरिषदेत खेटे मारीत आहेत . आरोग्य विभाग संबंधित जबाबदारी बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगत आहे . मात्र बांधकाम विभागाकडे तक्रार करुन देखील या समस्येचे निवारण होत नाही. प्रभुआळीमधील रहिवासी सुप्रिया पडवळ यांनी महिनाभरापूर्वी स्वच्छतागृह उभारलेले आहे. मात्र वारंवार पत्रव्यवहार करुन देखील नगरपरिषदेचे अधिकारी त्यांच्या स्वच्छतागृहाला मलनि:सारण वाहिन्यांची जोडणी देत नाही. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत २0 हजार रूपयांचा निधी दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात माझ्या खात्यात केवळ ६००० रूपये इतकीच रक्कम जमा झाल्याचे पडवळ यांनी सांगितले.
मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम लवकरच
नगरपरिषदेकडे एकूण ५९८ स्वच्छतागृहे उभारणीचे लक्ष्य होते. ते लक्ष्य नगरपरिषदेने पूर्ण केले आहे. बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची जोडणी मलनि:सारण वाहिनीला करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये सोसायटीमधील स्वच्छतागृहांना आम्ही प्राधान्य देत आहोत. लवकरच हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील उर्वरित स्वच्छतागृहांची जोडणी आम्ही करणार आहोत, असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Clean Maharashtra campaign will be destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.