स्वच्छ, स्मार्ट, भ्रष्टाचारमुक्त अमरावती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 01:26 PM2017-02-16T13:26:03+5:302017-02-16T13:26:03+5:30

महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजप सत्तासोपान चढेल, असा आशावाद भाजपचे महापालिका निवडणूक प्रमुख आ.सुनील देशमुख यांनी रविवारी व्यक्त केला.

Clean, smart, corruption free Amravati! | स्वच्छ, स्मार्ट, भ्रष्टाचारमुक्त अमरावती !

स्वच्छ, स्मार्ट, भ्रष्टाचारमुक्त अमरावती !

Next

स्वच्छ, स्मार्ट, भ्रष्टाचारमुक्त अमरावती !
भाजपचे हमीपत्र : स्पष्ट बहुमताचा दावा
अमरावती : महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजप सत्तासोपान चढेल, असा आशावाद भाजपचे महापालिका निवडणूक प्रमुख आ.सुनील देशमुख यांनी रविवारी व्यक्त केला. येथील पत्रकार भवनामध्ये देशमुख यांनी भाजपच्या विकासाचे हमीपत्र दिले. स्वच्छ ,स्मार्ट, भ्रष्टाचारमुक्त अमरावती हाच भाजपचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत भाजपने ७५ उमेदवार रिंंगणात उतरवले आहेत.
भाजपने हमीपत्राच्या रूपात जाहिरनामा प्रकाशित केल्याचे सांगत आ. देशमुख यांनी महापालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शहराची छबी बिघडवल्याचा आरोप केला. शहरावर ‘गोल्डन गँग’ने निरंकुश राज्य केले, अशी टीका त्यांनी केली. पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासोबतच सर्वांगिण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, हजारो हातांना रोजगार देणे, अमरावतीकरांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासह कचरामुक्त शहरासाठी भाजप वचनबध्द आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षाने शहराचे रुप बकाल झाले आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावणारी सक्षम यंत्रणा नाही. त्याअनुषंगाने ‘योजनापूर्वक स्वच्छता’ हा प्राधान्याचा विषय राहील, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला पुरक स्वच्छ अमरावती वास्तवात आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष वचनबद्ध राहिल. शहराची डासांपासून मुक्ती, प्रदूषणमुक्त अमरावती, विक्रमी वृक्षलागवडीला प्राधान्य हे पक्षाचे विकासाचे हमीपत्र असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रपरिषदेला शहराध्यक्ष जयंत डेहनकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण पातुरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, रवींद्र खांडेकर, तुषार भारतीय आणि रीता मोकलकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

दोषींना शासन करु
शहरात विकासकामांच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींना निश्चित शासन करु,असेही भाजपच्या हमीपत्रात नमूद आहे. महापालिकेचा कारभार पारदर्शीपणे चालविण्याचा संकल्प भाजपने मुद्रांकावर दिलेल्या अमरावतीकरांच्या जाहिरनाम्यातून सोडला आहे.

Web Title: Clean, smart, corruption free Amravati!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.