दिंडीतून होतेय स्वच्छतेचे प्रबोधन
By admin | Published: June 23, 2014 10:55 PM2014-06-23T22:55:49+5:302014-06-23T22:55:49+5:30
लोकसभेच्या निवडणुकीत व्हॅट्स अप,फेसबुक परिणाम करून गेले,पण लोकांच्या मनार्पयत पोचण्याचे काम आषाढी वारीच्या ¨दडय़ांमधूनच होते.
Next
>पुणो : लोकसभेच्या निवडणुकीत व्हॅट्स अप,फेसबुक परिणाम करून गेले,पण लोकांच्या मनार्पयत पोचण्याचे काम आषाढी वारीच्या ¨दडय़ांमधूनच होते. यंदा 5लाख वारक:यांर्पयत स्वच्छतेची प्रबोधन ¨दडी पोचणार आहे,असे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे सांगितले.
ग्रामविकास, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण विभाग तसेच विभागीय आयुक्तालय व जिल्हा परिषदेतर्फे आषाढी वारीनिमित्त स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी फिरते प्रचार रथ वारीसोबत पाठविले जाणार आहेत. त्याच्या उदघाटनप्रसंगी पाटील बोलत होते. ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एस.एस.संधु विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय भरणो, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशीगंधा माळी, ग्रामविकास विभागाचे उपसचिव किरण गित्ते, पुणो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी,अखिल भारतीय वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले आदी व्यासपीठावर होते.
गेल्या 9 वर्षापासून वारकरीच स्वच्छतेचे प्रचारक झाले आहेत, असे सांगून पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशिगंधा माळी यांनी सोलापूर जिल्हय़ात शंभर टक्के स्वच्छतागृहे बांधली जात नाहीत, तोर्पयत पादत्रणो न घालण्याची शपथ घेतली आहे. त्यांना लवकरच चप्पल घालायला मिळो, अशी अपेक्षा बोलून दाखविली.
किरण गित्ते यांनी 64 लाख स्वच्छतागृहे बांधण्यात आली असून 9हजार गावे निर्मल ग्राम झाली आहेत, असे सांगून अद्याप 58लाख स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दीष्ट असल्याचे नमूद केले.
प्रकाश महाराज बोधले यांच्या उपस्थितांच्या आडनावांवरून कार्यक्रमात हंशा झाला. संत गाडगेबाबांच्या वेषातील खंडुजी गायकवाड यांनी प्रभावी स्वच्छता किर्तन केले. (वार्ताहर)
विठ्ठलानेच सबुद्धी द्यावी
4स्वच्छतेच्या उद्दीष्टापासून आपण कोसो दूर आहोत. स्वच्छतेविषयीचे संत तुकडोजी महाराजांचे संदेश समाजात का रूजत नाहीत? असा प्रश्न करतानाच लोकांना कळते पण वळत नाही.आता विठ्ठलानेच लोकांना सुबुद्धी द्यावी, असे उदगार ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एस.एस.संधु यांनी काढले.