बसस्थानकातील गटारांची अखेर झाली स्वच्छता
By admin | Published: June 28, 2016 01:26 AM2016-06-28T01:26:41+5:302016-06-28T01:26:41+5:30
येथील एसटी बस स्थानकाच्या आवारातील तुंबलेल्या गटारांची तातडीने स्वच्छता करण्यात आली.
इंदापूर : येथील एसटी बस स्थानकाच्या आवारातील तुंबलेल्या गटारांची तातडीने स्वच्छता करण्यात आली. अस्वच्छतेविषयीचे सचित्र वृत्त गेल्या मंगळवारी (दि. २१) ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेण्यात आली.
वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधितांनी तुंबलेले गटार व चेंबर स्वच्छ केले. जंतुनाशक पावडरची फवारणी केली. मात्र, दुरुस्तीची इतरही कामे वेगाने करावीत, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
एसटी बस स्थानकातील गटार व चेंबर १५ दिवसांपासून तुंबली होती. मैलामिश्रित सांडपाणी वाहत होते. व्यापारी गाळ्यांकडून स्थानकाकडे जाणाऱ्या लोखंडी पुलाचा आधार असणारा लोखंडी खांब तळातून गंजला आहे,. अपघाताची दाट शक्यता आहे, एसटी बस ये-जा करण्याच्या मार्गावर, सुटण्याच्या ठिकाणी जागोजागी खड्डे पडलेले आहेत, व्यापारी गाळ्यांसमोरचा कचरा काढला जात नाही. या सर्व समस्या ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात सचित्र मांडल्या. या वृत्तामुळे गटार व चेंबरची स्वच्छता झाली. इतर कामे झाली नाहीत; ती व्हावीत, अशी अपेक्षा प्रवासीवगार्तून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)