शहरातील उद्यानांमध्ये स्वच्छता अभियान
By admin | Published: June 10, 2016 02:59 AM2016-06-10T02:59:50+5:302016-06-10T02:59:50+5:30
महानगरपालिका क्षेत्रातील उद्यान परिसरात येत्या १५ जूनपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील उद्यान परिसरात येत्या १५ जूनपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत उद्याने, बागबगिचे, राखीव जंगल, कांदळवन भागात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.
ऐरोली येथील सेक्टर तीन परिसरातील राजीव गांधी उद्यानामध्ये मंगळवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कोपरखैरणे सेक्टर १४ परिसरातील नाना पाटील उद्यानामधील परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. नेरुळ सेक्टर तीन परिसरातील चाचा नेहरू उद्यानाची स्वच्छता करून उपस्थित नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी सिध्दार्थ चौरे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी प्रसाद खोसे, उद्यान सहाय्यक विलास पडवळ, विभाग अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत तसेच नागरिक उपस्थित होते.
>बेलापूर विभागातील सेक्टर १ विभागातील मँगो उद्यानामध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी या उद्यानामध्ये स्वच्छतेचा संदेश पसरविण्यात आला. यावेळी नगरसेवक अशोक गुरखे, विभाग अधिकारी सुभाष अडागळे, कर्मचारी, स्वच्छतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेरुळ सेक्टर १९ मधील गुरुनानक उद्यान आणि कल्पना चावला उद्यानामधील परिसर स्वच्छ करण्यात आला. वाशी सेक्टर १ परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील उद्यानामध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत उद्यानातील संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.