गंगामैयाची स्वच्छता हे माझे पहिले काम
By admin | Published: May 18, 2014 01:08 AM2014-05-18T01:08:04+5:302014-05-18T02:03:24+5:30
गंगेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे, अशी भावनिक कृतज्ञता व्यक्त करतानाच गंगामैयाची स्वच्छता करणो हे माङो पहिले काम असणार आहे, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे दिली.
मोदींनी वाराणशीत दिले अभिवचन
वाराणशी : गंगेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे, अशी भावनिक कृतज्ञता व्यक्त करतानाच गंगामैयाची स्वच्छता करणे हे माझे पहिले काम असणार आहे, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे दिली. विश्वनाथ मंदिरात आशीर्वाद घेऊन मोदी दशाश्वमेध घाटावर पोहोचले़ तेथे वेदमंत्रांचा घोष व शंखनाद अशा भक्तीमय वातावरणात सुमारे अर्धा तास मोदींनी ‘गंगा आरती’ केली़ भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह, अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी त्यांच्यासोबत होते़ गंगा आरतीनंतर मोदी म्हणाले, या पवित्र भूमीला आणि मतदारांना मी नमन करतो. येथे उमेदवार म्हणून आलो मात्र काशीचा पुत्र होऊन गेलो आहे. न मागताच जी सर्व काही देते तिला आई म्हणतात. गंगा मातेनेही माझ्यासाठी काही खास कामाची योजना ठरवून ठेवली असणार. मोदी म्हणाले, येथे आर्थिक विकासाच्या अनेक संधी आहेत. तुमच्या साथीने मला विकास साध्य करता येईल.
मला केवळ तुमचे मतच नव्हे, तर तुमची साथ व सोबत हवी आहे. सभेला परवानगी नाकारून मला वाराणशीत बोलूही दिले गेले नव्हते. तरीही माझ्या मौनावरही तुम्ही विजयाचे शिक्कामोर्तब केलेत, असे सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले. गांधीजींची १५० वी जयंती खर्या अर्थाने साजरी करण्यासाठी मी एका कामाची जबाबदारी वाराणशीच्या लोकांवर सोपावतो आहे. गांधींनी स्वच्छतेवर भर दिला होता. म्हणूनच काशीमध्ये साफसफाई झाली पाहिजे़ पंतप्रधानाने फक्त अमेरिका, रशिया या विषयावर बोललेच पाहिजे असे नाही, छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायला हवी, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)