अंबाबाई मंदिर परिसराची रामदेव बाबांनी केली स्वच्छता
By admin | Published: January 22, 2015 10:51 PM2015-01-22T22:51:51+5:302015-01-23T00:48:24+5:30
देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी घाटी दरवाजा परिसरातून स्वच्छतेला सुरुवात केली. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात झाडलोट केली
कोल्हापूर : कणेरी मठावर सुरू असलेल्या भारतीय संस्कृती उत्सवासाठी कोल्हापुरात आलेल्या योगगुरू रामदेव बाबा व काडसिद्धेश्वर स्वामीजींनी आज, गुरुवारी अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसराची स्वच्छता केली. यावेळी त्यांनी अन्य शहरांच्या तुलनेत कोल्हापूर खूप स्वच्छ आहे, अशा शब्दांत प्रशंसा केली. आज सायंकाळी साडेपाच वाजता रामदेव बाबा व काडसिद्धेश्वर स्वामींचे अंबाबाई मंदिराच्या परिसरात आगमन झाले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी घाटी दरवाजा परिसरातून स्वच्छतेला सुरुवात केली. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात झाडलोट केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महापौर तृप्ती माळवी, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.रामदेव बाबा म्हणाले, देशात कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि त्याचा पुनर्वापर याबद्दल ठोस असे धोरण नाही. ते होण्याची गरज आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सुरुवात झाली आहे. पाच वर्षांनी त्याचे चांगले परिणाम दिसतील.
योगगुरू रामदेव बाबा व काडसिद्धेश्वर स्वामींनी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसराची स्वच्छता केली. या अभियानात खासदार धनंजय महाडिक, महापौर तृप्ती माळवी यांनीही सहभाग घेतला.