सर्जा-राजाचा मार्ग मोकळा, विधेयकाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 07:10 PM2017-04-06T19:10:41+5:302017-04-06T19:13:21+5:30

ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीचा मार्ग मोकळा

Clearance of Sarja-Raja, sanction to the bill | सर्जा-राजाचा मार्ग मोकळा, विधेयकाला मंजुरी

सर्जा-राजाचा मार्ग मोकळा, विधेयकाला मंजुरी

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.6-  ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभेत प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक कायदा एकमताने मंजूर झाला आहे.
 
शर्यतीदरम्यान प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे आता गावागावांमध्ये पुन्हा एकदा सर्जा-राजाची जोडी शर्यतीत धावताना दिसणार आहे. मात्र, बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. 
 
पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं आणि एकमताने मंजूर झालं.  
बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यासंदर्भात केंद्रीय पातळीवर विचारही सुरू होता. अखेर आज विधानसभेत प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक कायदा एकमताने मंजूर झाला.  
 
प्राणीप्रेमींनी न्यायालयात धाव घेऊन बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर तामीळनाडूच्या जलीकट्टूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती.
 
बैलगाडी शर्यत बद्दल थोडक्यात माहिती -
 
- बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला आहे. हा खेळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे होतो. सांगली साताऱ्यात चाकोरीतून गाड्या पळवल्या जातात. एका वेळी चार किंवा पाच गाड्या एकाच वेळी पळतात. या शर्यतीत गट, सेमी फायनल आणि फायनल अशा गाड्या पळतात.
 
- खेड भागात बैलगाडी शर्यतीसाठी घाट बांधले आहेत. घाटातून एकच गाडी पळते. इथे सेकंदावर नंबर दिले जातात. खेडच्या शर्यतीत, सगळ्यात पुढे घोडे, त्यामागे एक गाडी आणि शेवटी शर्यतीची गाडी असते.
 
-विदर्भात बैलगाडी शर्यतीला शंकरपट म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील काही गावात गाडीला घोडा आणि बैल जुंपून शर्यती होतात. रायगड जिल्ह्यात तर वाळूच्या रेतीत गाड्या पळवण्याची प्रथा आहे.

Web Title: Clearance of Sarja-Raja, sanction to the bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.