मुंबईत घामाच्या धारा, तर विदर्भात पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 09:29 AM2023-05-22T09:29:59+5:302023-05-22T09:31:14+5:30
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील हवामानात चढ उतार नोंदविण्यात येत असून, मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३३ अंंशांवर स्थिर असला तरी कमाल आर्द्रता अक्षरश: घाम फोडत आहे. दुसरीकडे राज्यात पाऱ्याची उसळी स्थिर असतानाचा आता पुढील तीन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. रात्रही ऊबदार नोंदविण्यात येत असून, मान्सून दाखल होईपर्यंत नागरिकांना अशाच काहीशा वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत गेल्या दोन दिवसांपासून वातावरणाने काहीसा दिलासा दिल्याने मुंबईकरांना कमी प्रमाणात चटके बसत असल्याचे चित्र आहे. तर कोकणात कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून, वाढती आर्द्रता आणखी घाम फोडणार आहे.
असा वाढतोय तापमानाचा पारा
परभणी ४४
सोलापूर ४३.५
जळगाव ४३
नांदेड ४२.२
छत्रपती संभाजीनगर ४१.१
बीड ४०.२
सातारा ३९.८
सांगली ३९.७
पुणे ३८.८
नाशिक ३७.५
मुंबई ३३.४
कोल्हापूर ३७.१