अपमानामुळे क्लिंटन होते आत्महत्येच्या विचारात
By admin | Published: May 7, 2014 11:06 PM2014-05-07T23:06:55+5:302014-05-07T23:06:55+5:30
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांबाबत मोनिका लेविन्स्कीने पहिल्यांदा मौन सोडले.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांबाबत मोनिका लेविन्स्कीने पहिल्यांदा मौन सोडले. या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर त्यांनी (क्लिंटन) आत्महत्या करण्याचाही विचार केला होता, असे ती म्हणाली. आमच्यातील संबंध परस्पर संमतीने होते. मात्र, माजी अध्यक्षांनी माझा गैरफायदा घेतला, असे मोनिकाने एका लेखात म्हटले आहे. तिने हा लेख ‘व्हॅनिटी फेअर’ या नियतकालिकासाठी लिहिला आहे. यात तिने म्हटले आहे, मी आणि अध्यक्ष क्लिंटन यांच्यात जे झाले मला त्याचा खूप खेद वाटतो. मी पुन्हा म्हणेन जे झाले मला स्वत:ही त्याचा खूप खेद आहे. मात्र, मी अखेर आपले मत व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. मला याची किती किंमत मोजावी लागेल हे लवकरच कळेल. व्हॅनिटी फेअरने या लेखाचा काही भाग प्रसिद्ध केला असून संपूर्ण लेख आठ मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. क्लिंटन यांच्यासोबतचे प्रेमसंबंध उभयतांच्या संमतीने होते. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर त्यांना जो सार्वजनिक अपमान सहन करावा लागला त्याने त्यांच्या जीवनाची दिशाच बदलून गेली. निसंशयपणे माझ्या बॉसने माझा फायदा घेतला. मात्र, मी यावर नेहमीच ठाम राहील, की आमच्या दोघांतील संबंध परस्पर सहमतीने होते. (वृत्तसंस्था)