‘चमत्कारी‘ वस्तूंच्या जाहिराती बंद करा
By admin | Published: June 26, 2014 12:47 AM2014-06-26T00:47:36+5:302014-06-26T00:47:36+5:30
लोकांच्या धार्मिक भावनांचा फायदा घेत दूरचित्रवाणीवर विविध देवदेवतांच्या नावावर चमत्कारिक वस्तूची जाहिरात केली जात आहे.
Next
>नागपूर : लोकांच्या धार्मिक भावनांचा फायदा घेत दूरचित्रवाणीवर विविध देवदेवतांच्या नावावर चमत्कारिक वस्तूची जाहिरात केली जात आहे. यामुळे लोकांची आर्थिक पिळवणूक व धार्मिक विश्वासाचा अवमान होत आहे. याविरुद्ध एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. सर्वप्रकारचे दु:ख दूर करण्याचा व मनवांच्छित फळ प्राप्त करण्याचा दावा करणा:या चमत्कारिक जाहिराती बंद करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने सरकारी विभागांसह दहा संस्थाना दोन आठवडय़ांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत़
काही दूरचित्रवाहिन्यांवर दररोज चमत्कारिक जाहिराती प्रसारित केल्या जातात. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाने यासंदर्भात 25 नोव्हेंबर 1995 पासून ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अॅक्ट’ लागू केला आहे. चमत्कारिक धार्मिक जाहिराती कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणा:या आहेत. राज्यातील जादूटोणाविरोधी कायदाही पायदळी तुडविला जात असल्याचे अॅड. गीतेश पांडे या याचिकाकत्र्याचे म्हणणो आहे. चमत्कारिक जाहिरातींविरुद्ध याचिकाकत्र्याने 6 मे रोजी राज्य शासनाच्या संबंधित विभागांना निवेदन सादर करून, वादग्रस्त जाहिरातींवर कारवाईची मागणी केली होती. जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अॅडव्हर्टायङिांग स्टॅण्डर्डस् कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आहे. याचिकाकत्र्याने या संस्थेलाही निवेदन दिले होते. यावरून संबंधित वाहिन्यांना नोटीस बजावण्यात आली होती, परंतु वाहिन्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे कौन्सिलने गेल्या फेब्रुवारीत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाला पत्र लिहिले. यानंतरही हनुमान चालिसा यंत्रची जाहिरात सुरू असल्याने मंत्रलयाने काहीच कारवाई केली नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे याचिकाकत्र्याने निदर्शनास आणून दिले आहे.
न्यायमूर्ती भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले. (प्रतिनिधी)