दीडशेंवर चारा छावण्या बंद

By Admin | Published: June 6, 2016 11:53 PM2016-06-06T23:53:57+5:302016-06-06T23:57:22+5:30

बीड : जिल्ह्यातील सुरू असलेल्या २७४ छावण्यांपैकी १५१ छावण्यांवर जनावरे राहिली नसल्याने बंद झाल्या असल्याचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला.

Close the fodder camps at half past | दीडशेंवर चारा छावण्या बंद

दीडशेंवर चारा छावण्या बंद

googlenewsNext

बीड : जिल्ह्यातील सुरू असलेल्या २७४ छावण्यांपैकी १५१ छावण्यांवर जनावरे राहिली नसल्याने बंद झाल्या असल्याचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला.
मागील चार दिवसांत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे छावणीतील उभारलेले गोठे, पत्रे वाऱ्याने उडाले. जनावरांचेही मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी वीज पडून जनावरे दगावली. अशी परिस्थिती उद्भवल्याने पशुमालकांनी छावणीतील जनावरे घरच्या दावणीला घेऊन जाणे पसंत केले. बंद झालेल्या १५१ छावण्यांमध्ये केज तालुक्यात १५ पैकी ६, शिरूरमध्ये १४ पैकी १०, आष्टीत ११४ पैकी ७२ तर बीडमध्ये ८२ पैकी ३४ छावण्या बंद पडल्या आहेत.
पशुमालकांनी जनावरे घरी नेली असली तरी सध्या पशुमालकांकडेही चारा उपलब्ध नाही. छावणीत वादळी वाऱ्यासह पावसाचा त्रास सहन करण्यापेक्षा जनावरे घरी नेली आहेत. मात्र, चारा आणायचा कोठून हा यक्ष प्रश्न आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Close the fodder camps at half past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.