इंदिरा गांधींचे बीएनएचएसशी जवळचे संबंध - जयराम रमेश
By admin | Published: July 12, 2017 02:07 AM2017-07-12T02:07:17+5:302017-07-12T02:07:17+5:30
एक राजकारणी म्हणून इंदिरा गांधी यांच्यावर अनेक लेखकांनी खूप लेखन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एक राजकारणी म्हणून इंदिरा गांधी यांच्यावर अनेक लेखकांनी खूप लेखन केले आहे. परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर फार कुणी लिहिले नाही. इंदिरा गांधींना पर्यावरणाबाबत आस्था होती. याबाबत तर कोणालाही फारशी कल्पनाही नाही. म्हणूनच मी
इंदिरा गांधींबद्दल ‘इंदिरा गांधी : इ लाइफ इन नेचर’ हे पुस्तक लिहिले आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीशी (बीएनएचएस) इंदिरा गांधी यांचे फार जवळचे संबंध होते. त्यामुळे या पुस्तकाचे प्रकाशन बीएनएचएसच्या वास्तूत करत आहे. ही इंदिरा गांधींना श्रद्धांजलीच आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केले.
जयराम रमेश लिखित ‘इंदिरा गांधी : इ लाइफ इन नेचर’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी फोर्ट येथील हॉर्नबिल हाउस येथे करण्यात आले. या वेळी रमेश यांच्यासह बीएनएचएसचे अध्यक्ष होमी खुस्रोखान व संचालक दीपक आपटे उपस्थित होते. या वेळी दीपक आपटे म्हणाले की, या पुस्तकामुळे आम्हाला इंदिरा गांधी आणि बीएनएचएसच्या संबंधांबद्दल समजले. त्यांनी पर्यावरणासंबंधी केलेल्या कामांबद्धल माहिती मिळाली. इंदिरा गांधी बीएनएचएसच्या सर्व कामांच्या पाठीमागे उभ्या राहत होत्या, हे आपटे यांनी आवर्जून सांगितले.